नाशिक महापालिका आयुक्तांना शिवीगाळ तसेच त्यांच्यावर हात उगारणे प्रहार संघटनेचे नेते आणि राज्याचे माजी मंत्री बच्चू कडू बच्चू कडू यांना महागात पडले आहे. नाशिक जिल्हा व सत्र न्यायालयाने या प्रकरणी बच्चू कडूंना दोषी ठरवले आहे.न्यायालयाने आमदार बच्चू कडू यांना दोन वर्षांची कारावासाची शिक्षा सुनावली आहे. न्यायालयाने दिलेल्या निर्णयानंतर पोलिसांनी बच्चू कडू यांना ताब्यात घेतल्याचे सांगण्यात येत आहे. पोलिसांनी बच्चू कडू यांना नाशिक जिल्हा व सत्र न्यायालयात पोलिसांनी हजर केले आहे. येथे जामिनाची प्रक्रिया पूर्ण केली जाणार असल्याचे सांगण्यात येत आहे.
न्यायालयाच्या निकालानंतर बच्चू कडू यांच्या अडचणीत वाढ झाली आहे. त्यामुळे बच्चू कडू आता पुढचे कुठले पॉल उचलतात याकडे सगळ्यांचे लक्ष्य लागले आहे. बच्चू कडू तुरुंगात जाणार की उच्च न्यायालयात दाद मागणार? याबद्दल चर्चा रंगली आहेत. न्यायालयाच्या निकालानंतर बच्चू कडू यांच्या सार्थकांमध्येही अस्वस्थता निर्माण झाली आहे. बच्चू कडू यांना २०१७ मध्ये नाशिकच्या मनपा आयुक्तांवर हात उगारल्याप्रकरणी ही शिक्षा ठोठावण्यात आली आहे. या निकालाविरोधात वरच्या न्यायालयात जाऊ. तसेच, नाशिक जिल्हा व सत्र न्यायालयातच जामिनासाठी अर्ज करणार असल्याचे बच्चू कडू यांनी म्हटले आहे.
नाशिक महापालिकेत अपंगांच्या मागण्यांसाठी प्रहार संघटनेतर्फे २०१७ मध्ये आंदोलन करण्यात आले होते. दिव्यांग कल्याण निधी पालिका आयुक्तांनी खर्च केला नाही, असा आरोप करत बच्चू कडू यांनी आंदोलन छेडले होते. या आंदोलनाच्या वेळी महापालिका आयुक्त अभिषेक कृष्णा आणि बच्चू कडू यांच्यामध्ये वादाची ठिणगी पडली. त्यानंतर बच्चू कडूं यांनी आयुक्तांना धमकावले व त्यांच्यावर हात उगारला, असा आरोप करण्यात येत आहे. आंदोलनांतर पोलिसांनी बच्चू कडू यांना ताब्यातही घेतळे . सरकारी अधिकाऱ्यावर हात उगारणे व सरकारी कामात अडथळा आणल्याप्रकरणी बच्चू कडूंवर सरकारवाडा पोलिस स्टेशनमध्ये दोन गुन्हेही दाखल करण्यात आले होते. बच्चू कडू यांच्या या प्रकरणाची २०१७ पासून सुनावणी सुरु होती. या प्रकरणी नाशिक जिल्हा व सत्र न्यायालयाने बच्चू कडू यांना भादंवि कलम ३५३ कलमान्वये एका वर्षाची शिक्षा सुनावली आहे.