नाशिक पोलीस आयुक्तांचा इशारा; भोंग्यासाठी परवानगी घ्या अन्यथा….

नाशिक पोलीस आयुक्तांचा इशारा; भोंग्यासाठी परवानगी घ्या अन्यथा….

राज्यात सध्या मशिदीवरील भोंग्यावरून वाद सुरू आहे. याच पार्श्वभूमीवर नाशिकचे पोलीस आयुक्त दीपक पांडे यांनी महत्त्वाचा आदेश दिला आहे. त्यांनी दिलेल्या आदेशानुसार नाशिकमधील मशीदच नव्हे तर सर्वच धार्मिक स्थळांवरच्या भोंग्यांना ३ मे पर्यंत परवानगी घ्यावी लागणार आहे. अन्यथा ३ मे नंतर पोलिसांकडून कारवाई करण्यात येणार आहे.

नाशिक पोलीस आयुक्त दीपक पांडे यांनी दिलेल्या आदेशानुसार, मशिदीच्या १०० मीटर लांब आणि अजानपूर्वी १५ मिनिटं हनुमान चालीसा लावण्याची परवानगी आहे. तसेच धार्मिक स्थळी कोणत्याही कार्यक्रमासाठी भोंगे लावायचे असल्यास परवानगी आवश्यक आहे. ३ मे नंतर प्रार्थनास्थळावर विनापरवानगी भोंगे असतील तर त्यावर कारवाई करण्यात येणार असल्याचे दीपक पांडे यांनी सांगितले आहे.

नाशिक शहर पोलीस आयुक्तालयाच्या हद्दीत असणाऱ्या मशीद, मंदिर, गुरुद्वारा, चर्च व इतर सर्व धार्मिक स्थळ, आस्थापनांना भोंग्यासाठी पोलीस आयुक्तांची परवानगी घ्यावी लागणार आहे. लेखी अर्जानंतर भोंगे लावण्याची परवानगी मिळणार आहे. विनापरवानगी भोंगे असलेल्या प्रार्थनास्थळावर कारवाई करण्यात येणार असून यामध्ये किमान चार महिने ते एक वर्षाचा कारावास आणि दंड अशी शिक्षा होऊ शकते. तसेच नागरिकांनी आयुक्तांच्या आदेशांचे पालन करावे, असे आवाहन करण्यात आले आहे.

हे ही वाचा:

… म्हणून WHO चे महासंचालक येणार भारत दौऱ्यावर

आमदार गणेश नाईक यांच्या प्रेयसीची तक्रार; बेलापूर पोलीस ठाण्यात गुन्हा

दिल्ली हिंसाचाराप्रकरणी मुख्य आरोपी मोहम्मद अन्सारसह १४ अटकेत

‘जेम्स लेन यांच्या पुस्तकातील प्रत्येक वाक्य शिवरायांविरोधात’

गुढीपाडव्याच्या मेळाव्यात मशिदी समोर हनुमान चालीसा लावण्याचे आव्हान राज ठाकरे यांनी केले होते. तसेच उत्तर सभेतही राज ठाकरे यांनी हा मुद्दा उचलून धरला होता. त्यानंतर नाशिक पोलीस आयुक्तांनी आता हे आदेश काढले आहेत.

Exit mobile version