31 C
Mumbai
Friday, May 2, 2025
घरराजकारणपिके, सीके सब फिके है....नरोत्तम मिश्रांचा हल्लाबोल!

पिके, सीके सब फिके है….नरोत्तम मिश्रांचा हल्लाबोल!

Google News Follow

Related

भाजपचे नेते नरोत्तम मिश्रा यांनी प्रशांत किशोर यांच्यावर निशाणा साधला आहे. राजकीय रणनीतीकार प्रशांत किशोर यांना प्रत्युत्तर देताना ते बोलत होते. प्रशांत किशोर यांनी ट्विट करत “बंगाल मध्ये भाजपा दोन आकडी संख्या पार करू शकत नाही.” असे विधान केले होते. त्याला प्रत्युत्तर देताना मिश्रा यांनी जोरदार हल्ला चढवला आहे.

“जेव्हा जनता उभी राहते तेव्हा पिके, सीके सगळे फिके पडतात” असे मिश्रा म्हाणाले. “किशोर यांनी उत्तर प्रदेश मध्ये खाप पंचायत भरवून काँग्रेस खाटेवर नेली, तर अखिलेश यादवांची सायकल पंक्चर केली. आता ते बंगाल मध्ये तृणमूलला गवताच्या काडीप्रमाणे उडवून लावतील.” असा घणाघात मिश्रा यांनी केला.

भारतीय जनता पक्षाने मिशन बंगाल खूपच गांभीर्याने घेतले आहे.  भाजपाचे चाणक्य अमित शहा, राष्ट्रीय अध्यक्ष जगत प्रकाश नड्डा यांनी बंगालसाठी कंबर कसली आहे. मध्य प्रदेश सरकारचे मंत्री असणारे नरोत्तम मिश्रा हे बंगाल मोहिमेतील महत्वाच्या शिलेदारांपैकी एक आहेत

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

113,000चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
245,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा