हिंदुत्वाची विचारसरणी हि काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या पायदळी नेऊन ठेवली होती

नरेश म्हस्के यांची टीका

हिंदुत्वाची विचारसरणी  हि काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या  पायदळी नेऊन ठेवली होती

आमचा वाघ कोल्ह्या लांडग्यांच्या सहवासांत गुदमरला होता , तो वाघ कोल्हा लांडग्यांच्या कळपातून बाहेर पडला असल्याचे वक्तव्य शिंदे गटाचे प्रवक्ते नरेश म्हस्के यांनी केले आहे.  बाळासाहेब ठाकरे यांचे आशीर्वाद आम्हाला मिळाले आहेत , म्हणूनच आमच्या बाजूने निकाल लागला. बाळासाहेबांचा हिंदुत्वाचा विचार गुदमरला होता , तोच विचार आज बाहेर पडला असल्यामुळे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हाती अधिकृतपणे हिंदुत्वाचा झेंडा आमच्याकडे आला असल्याचे वर्ष म्हस्के म्हणाले.   उद्धव ठाकरे यांनी बाळासाहेबांची हिंदुत्वाची विचारसरणी हि काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या पायदळी नेऊन ठेवली होती त्यांनी लाचारी पत्करून सत्तेत आले असेही पुढे नरेश म्हस्के म्हणाले. फक्त सहानभूती मिळवण्यासाठी लोकांमध्ये सभ्रम निर्माण करन्याची त्यांची चाल होती कारण त्यांना माहिती होते निकाल काय लागणार आहे , सत्यमेव जयते जे म्हणतात सत्याचाच विजय झाला असेही म्हस्के पुढे म्हणाले. बहुमत आहे म्हणून चिन्ह आणि नाव चिन्ह चोरले असे जर का ते म्हणत असतील तर, त्यांनी पोलिसात रीतसर तक्रार करायची होती. आज निवडणूक आयोग आणि घटनापीठाने याच पोलिसांच्या रूपात काम केले आहे. ज्यांच्याकडे बहुमत आहे त्यांनाच पक्षाचे चिन्ह आणि नाव मिळाल्याचे म्हस्के म्हणाले. लोकांना सुद्धा माहिती आहे की,  भावनिक अपील तुम्ही किती दिवस करणार वारसा हा फक्त रक्ताचा नसून तो विचारांचा पण असणे गरजेचे आहे आणि हाच हिंदुत्वाच्या विचारांचा वारसा एकनाथजी शिंदे पुढे नेत आहेत म्हणून विजय आमचा झाला.

हे ही वाचा:

सूत्रधार समोर आला, सोरोस यांचा पपलू कोण?

खरी शिवसेना एकनाथ शिंदेंची!! धनुष्यबाण चिन्हही शिंदेकडे!

भारतातील हे आहे सर्वाधिक वाहतूक कोंडीचे शहर, काय आहे दिल्ली-मुंबईची स्थिती

वेळकाढूपणा हवा म्हणून मोठ्या खंडपीठाची मागणी

कायदा सत्याच्या बाजूने ठाकरे गटाने सुप्रीम कोर्टात जावे किंवा यूनो मध्ये जावे किंवा आणखी कुठेही जावे. कायद्याप्रमाणे निकाल आमच्याच बाजूने लागला असल्याचेही म्हस्के म्हणाले. आता पहिल्यांदा ते पवार साहेबांकडे जाऊन ते देतील त्याप्रमाणे सूचना ऐकून ते तसेच चालतील असा  टोलासुद्धा म्हस्के यांनी लगावला.  पक्षात सगळ्यात जास्त आमदार आमचे आहेत. त्यामुळे कायद्याप्रमाणे पक्षाचे चिन्ह आणि नाव आम्हाला मिळाले आहे. आता खरा शिवसैनिक आनांदात आहेत. देवाकडे जे शिवसैनिकांनी साकडे घातले होते ते आज पूर्ण झाल्याचे म्हस्के म्हणाले. लोकशाही कशाला म्हणतात लोकशाहीमध्ये बहुमतालाच प्राधान्य दिले जाते. ज्यांचे खासदार जास्त असतात त्यांना देशात लोकसभेत पंतप्रधान बनवण्याचा अधिकार असतो ज्यांचे आमदार राज्यांत जास्त असतात ते मुख्यमंत्री निवडतात. आमचे आमदार जास्त होते, म्हणून आम्हाला अधिकार मिळाला. आमचे खासदार पण जास्त आहेत, लोकप्रतिनिधी पण जास्त आहेत त्यामुळे लोकशाही मार्गानेच हा निर्णय आमच्या बाजून लागला आहे  असेही नरेश म्हस्के पुढे म्हणाले.

Exit mobile version