कृषि कायदे रद्द करणारे विधेयक सादर; विरोधकांचा प्रचंड गोंधळ

कृषि कायदे रद्द करणारे विधेयक सादर; विरोधकांचा प्रचंड गोंधळ

सोमवारी संसदेत केंद्रीय कृषिमंत्री नरेंद्रसिंह तोमर यांनी तिन्ही कृषि कायदे रद्द करणारे विधेयक सादर केले, पण त्यावेळी विरोधकांनी प्रचंड गोंधळ घातला. त्यामुळे सभागृह तहकूब करण्यात आले.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गेल्या आठवड्यात हे कायदे मागे घेत असल्याची जाहीर घोषणा केली. त्यानंतर त्याची प्रक्रिया आता अधिवेशनात सुरू झाली आहे.

कृषिमंत्री नरेंद्र तोमर यांनी हे विधेयक संसदेत मांडल्यावर ते मंजूर करण्यात आले. त्यावेळी विरोधकांनी घोषणाबाजी करत गोंधळ घातला. लोकसभाध्यक्ष ओम बिर्ला यांनी चर्चा करण्याची तयारी असल्याचेही सांगितले पण विरोधक ऐकायला तयार नव्हते. त्यामुळे अखेर सभागृह तहकूब करण्यात आले.

हिवाळी अधिवेशनासाठी संसदेचे अधिवेशन सुरू झाल्यावर कृषिकायद्यांसंदर्भात घोषणाबाजी व गोंधळामुळे ते तासाभरातच स्थगित करण्यात आले. पण पुन्हा एकदा कामकाज सुरू झाल्यानंतर मिनिटभरातच हे तिन्ही कायदे मागे घेत असल्याचे विधेयक मांडून ते मंजूर केले गेले.

 

हे ही वाचा:

परमबीर-सचिन वाझे एकमेकांसमोर

‘सदन की कार्यवाही शुरु…’ संसदेच्या हिवाळी अधिवेशनाला सुरुवात

तिजोरीत पैसा नाही, शेतकऱ्यांना कर्जमाफी नाही

भाईंदरमध्ये फेरीवाल्याकडून पालिका अधिकाऱ्यावर रॉडने हल्ला

 

त्याआधी, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सरकार सर्व प्रश्नांची उत्तरे देण्यास तयार आहे, असे सांगितले. मात्र ते प्रश्न विचारताना संसदेच्या प्रतिष्ठेला धक्का बसणार नाही, याची काळजी घ्यावी अशी विनंतीही पंतप्रधानांनी केली. या अधिवेशनात एकूण ३० विधेयके मांडली जाणार आहेत. एक वित्त विधेयकही त्यात असेल. या अधिवेशनासाठी सत्ताधारी भाजपा तसेच विरोधी पक्षांनी आपापल्या खासदारांना उपस्थित राहण्यासाठी व्हिप बजावला होता. ज्या विधेयकांना अधिवेशनात मांडण्यात येणार आहे त्यात बहुचर्चित क्रिप्टोकरन्सीचे विधेयकही आहे.

Exit mobile version