देशात पार पडलेल्या लोकसभा निवडणुकीचा निकाल लागला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी हे वाराणसी येथून निवडणूक लढवत होते. या निवडणुकीत नरेंद्र मोदी यांनी मोठा विजय मिळवला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी हे तिसऱ्यांदा वाराणसी येथून निवडणुकीच्या रिंगणात होते. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी यापूर्वी वाराणसीतूनच २०१४ आणि २०१९ च्या लोकसभा निवडणुकीत सलग दोन वेळा विजय मिळवला होता. यावेळी त्यांनी पुन्हा एकदा विजय मिळवत विजयाची हॅट्रिक केली आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना ६ लाख १२ हजार ९७० मते मिळाली आहेत. तर, काँग्रेसचे अजय राय यांचा १ लाख २५ हजारांनी पराभव झाला आहे. त्यांना ४ लाख ६ हजार ४५७ मते मिळाली. पहिल्या सत्रात अजय राय आघाडीवर होते. परंतु, दुपारच्या सत्रानंतर नरेंद्र मोदींनी आघाडी घेतली ती शेवटपर्यंत ठेवत विजय मिळवला आहे.
हे ही वाचा:
मंडीच्या गादीवर ‘क्विन’च! कंगना रनौतकडून काँग्रेसच्या विक्रमादित्य सिंह यांचा परभव
नरेश म्हस्के ठरले जायंट किलर, ठाण्यात राजन विचारेंना पाडले
सांगलीमध्ये मविआला दणका देत विशाल पाटलांनी उधळला गुलाल
इंदूरमध्ये मतदारांची भाजपानंतर ‘नोटा’ला पसंती
उत्तर प्रदेशमधील वाराणसीमध्ये अंतिम टप्प्यात म्हणजेच १ जून रोजी मतदान पार पडले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी यापूर्वी वाराणसीतूनच २०१४ आणि २०१९ च्या लोकसभा निवडणुकीत दोन वेळा विजय मिळवला होता. त्यामुळे २०२४ मध्ये नरेंद्र मोदी हे आता हॅट्रिक करण्यासाठी सज्ज असल्याचे बोलले जात होते. अखेर जनतेने कौल दिला असून निकाल नरेंद्र मोदी यांच्या बाजूने लागला आहे.