… म्हणून पंतप्रधान मोदींचा फोटो आता लस प्रमाणपत्रावर दिसणार नाही

… म्हणून पंतप्रधान मोदींचा फोटो आता लस प्रमाणपत्रावर दिसणार नाही

कोरोना प्रतिबंधक लस घेतल्यानंतर मिळणाऱ्या प्रमाणपत्रावर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा फोटो छापून येतो. मात्र, आता काही राज्यांमध्ये नरेंद्र मोदी यांचा फोटो छापून येणार नाही. उत्तर प्रदेश, उत्तराखंड, गोवा, पंजाब आणि मणिपूर या पाच राज्यांमध्ये लस प्रमाणपत्रावर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा फोटो आता छापून येणार नाही.

पाच राज्यांमध्ये विधानसभा निवडणुका होणार असून त्यांच्या तारखा जाहीर करण्यात आल्या आहेत. त्यामुळे तारखा जाहीर होताच राज्यांमध्ये आचारसंहिताही लागू झाली आहे. आचारसंहितेचा भंग होऊ नये यासाठी आता उत्तर प्रदेश, उत्तराखंड, गोवा, पंजाब आणि मणिपूर या राज्यांमध्ये लस प्रमाणपत्रावर नरेंद्र मोदी यांचा फोटो छापून येणार नाही.

हे ही वाचा:

हिमवादळात अडकलेल्या पर्यटकांचे स्नो बाइकर्सने वाचवले प्राण

भायखळ्यात लाकडाच्या वखारीला भीषण आग

आजपासून यांना मिळणार बूस्टर डोस

गुरु गोविंदसिंग यांच्या सुपुत्रांचा बलिदान दिन आता ‘वीर बाल दिवस’

शनिवारी मुख्य निवडणूक आयुक्तांनी पत्रकार परिषद घेऊन पाच राज्यांच्या निवडणुकांच्या तारखेची घोषणा केली होती. या घोषणेनुसार उत्तर प्रदेशमध्ये सात टप्प्यात, तर पंजाब, उत्तराखंड, गोव्यामध्ये एका टप्प्यात, तर मणिपूरमध्ये दोन टप्प्यात निवडणुका पार पडणार आहेत. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सभा, रॅली यांना बंदी घालण्यात आली आहे. तसेच आचारसंहितेचा भंग होऊ नये म्हणून लस प्रमाणपत्रावरील मोदींचा फोटोही आता दिसणार नाही, असे माहिती केंद्रीय आरोग्य मंत्रालयातील एका अधिकाऱ्याने दिली आहे.

Exit mobile version