पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सोमवारी कोविड १९ लसीकरणाच्या बाबत जाहीर केलेला निर्णय म्हणजे ‘सौ सोनार की एक लोहार की’ अशा स्वरूपाचा आहे असे मत भारतीय जनता पार्टीचे नेते आमदार अतुल भातखळकर यांनी व्यक्त केले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या निर्णयाचे स्वागत करताना त्यांनी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनाही सणसणीत चपराक लगावली आहे.
सोमवार, ७ जून रोजी देशाच्या जनतेशी संवाद साधताना देशातील कोविड १९ लसीकरणाशी संबंधित महत्वाचे निर्णय घेतले. देशभरातील लसीकरणाची संपूर्ण जबाबदारी आता केंद्र सरकारने आपल्या खांद्यावर घेतली असून येत्या २१ जूनपासून देशातील प्रत्येक राज्यांत १८ वर्षांपेक्षा अधिक वयाच्या नागरिकांना मोफत लस देण्याची महत्त्वांकाक्षी घोषणा पंतप्रधानांनी केली.
हे ही वाचा:
पंतप्रधानांची भेट घेण्यापूर्वी स्वतःच्या हातातील गोष्टी करायला हव्या होत्या
ठाकरे सरकारचा आता नालेसफाई घोटाळा?
भाजपामध्ये कोणत्याही प्रकारची अस्वस्थता नाही
राज्यांच्या अपयशावर उतारा; सर्वांना मोफत लसीची मोदींची घोषणा
या निर्णया भरूनच केंद्र सरकारचे अभिनंदन करताना भाजपा आमदार अतुल भातखळकर यांनी राज्य सरकारला फैलावर घेतले. वायफळ बडबड करणाऱ्या मुख्यमंत्र्यांची हा निर्णय म्हणजे ‘सौ सोनार की एक लोहार की’ असा असल्याचे त्यांनी म्हटले आहे. जेव्हा केंद्र सरकार ४५ वयाच्या वरच्या नागरिकांचे लसीकरण करत होते तेव्हा राज्याने बोंबाबोंब केली. आम्हाला निर्णय घ्यायचे स्वातंत्र्य द्या अशी मागणी केली. पण जेव्हा तसे स्वातंत्र्य बहाल करण्यात आले तेव्हा मात्र यांनी महिना उलटून गेला तरी एक रुपयाची लस खरेदी केली नाही असे टीकास्त्र भातखळकर यांनी डागले आहे. सुरुवातीपासूनच राज्य सरकारची नियत खोटी होती असे म्हणत आज यांचे अगाध कर्तुत्व उघड पडलं असा घणाघात भातखळकर यांनी केला आहे.
निष्क्रीय राज्य सरकारांच्या मख्खपणामुळे चिंताक्रांत झालेल्या कोट्यवधी लोकांना दिलासा देणारा मास्टर स्ट्रोक आज मोदींनी मारला. पंतप्रधानांचे धन्यवाद… @narendramodi pic.twitter.com/y6qmDqxTaG
— Atul Bhatkhalkar (@BhatkhalkarA) June 7, 2021