पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची आज(१५ मे) नाशिकमध्ये सभा पार पडली.महायुतीचे उमेदवार हेमंत गोडसे आणि भारती पवार यांच्या प्रचारकरिता पिंपळगाव येथील सभेला पंतप्रधान मोदींनी संबोधित केले.या सभेत पंतप्रधान मोदींनी शरद पवार, उद्धव ठाकरे यांच्यावर जोरदार निशाणा साधला.लोकसभा निवडणुकीनंतर बरेच प्रादेशिक पक्ष काँग्रेसमध्ये विलीन होतील, असे शरद यांनी म्हटले होते.यावर पंतप्रधान मोदींनी उद्धव ठाकरेंवर टीका करताना म्हटले की, ठाकरे गट जेव्हा काँग्रेसमध्ये विलीन होईल, तेव्हा मला बाळासाहेब ठाकरे यांची आठवण येईल. त्यांना खूप दु:ख होईल.नकली शिवसेनेने बाळासाहेब ठाकरेंची स्वप्नं धुळीला मिळवली आहेत.वीर सावरकरांची दिवसरात्र निंदा करणाऱ्या काँग्रेस पक्षाला नकली शिवसेनेचे लोक डोक्यावर घेऊन नाचत असल्याची टीका पंतप्रधान मोदी केली.
लोकसभा निवडणुकीचा नुकताच चौथा टप्पा पार पडला असून येणाऱ्या पाचव्या टप्प्यासाठी प्रचार सभा जोरदार सुरु आहेत.महाराष्ट्रातील हा शेवटचा टप्पा असणार आहे.यासाठी राज्यातील पक्षांकडून प्रचार सभांचा धडाका सुरु आहे.दरम्यान, महायुतीचे उमेदवार हेमंत गोडसे आणि भारती पवार यांच्या प्रचार सभेला पंतप्रधान मोदींनी संबोधित केलं.यावेळी पंतप्रधान मोदींनी शरद पवारांच्या राष्ट्रवादीला नकली राष्ट्रवादी आणि उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेला नकली शिवसेना म्हणत हे दोन्ही नकली पक्ष काँग्रेसमध्ये विलीन होणार असल्याचा दावा त्यांनी यावेळी केला.
मागील काही दिवसांपूर्वी राष्ट्रवादी शरद पवार गटाचे अध्यक्ष शरद पवार यांनी पत्रकार परिषद घेतली होती.शरद पवारांनी त्यावेळी दावा केला की, येत्या काळात बरेच प्रादेशिक पक्ष काँग्रेसमध्ये विलीन होतील, तसेच उद्धव ठाकरे देखील आमच्याच विचाराचे आहेत, असे शरद पवार म्हणाले होते.यावर पंतप्रधान मोदी म्हणाले की, हे दोन्ही नकली पक्ष काँग्रेसमध्ये विलीनीकरण होणार हे नक्की आहे. परंतु, नकली शिवसेना जेव्हा काँग्रेसमध्ये विलीन होईल तेव्हा मला सर्वात जास्त आठवण येईल ती बाळासाहेब ठाकरेंची.कारण बाळासाहेब ठाकरे म्हणायचे ज्यादिवशी शिवसेनेची काँग्रेस होताना दिसेल तेव्हा मी माझं दुकान बंद करेन. आता नकली शिवसेनेचं अस्तित्त्व संपणार आहे. नकली शिवसेनेने बाळासाहेब ठाकरेंची स्वप्नं धुळीला मिळविल्याचे पंतप्रधान मोदी म्हणाले.
हे ही वाचा:
उज्ज्वल निकम यांच्या प्रचारार्थ योगी आएंगे आएंगे योगी आएंगे
‘बँक कर्मचारीचं निघाले चोर, लंपास केले ४२ लाख रुपये!
‘ज्या दिवशी हिंदू-मुस्लिम भेद करीन, तेव्हापासून सार्वजनिक जीवनात राहण्यायोग्य नसेन’
महादेव बेटिंग ऍपप्रकरणी ७० जण ताब्यात
बाळासाहेब ठाकरे यांचं स्वप्न होतं की, अयोध्येत भव्य राम मंदिराचं निर्माण व्हावं. जम्मू-काश्मीरमधून कलम ३७० रद्द व्हावं. बाळासाहेबांचे हे स्वप्न पूर्ण झालं.परंतु नकली शिवसेनेला याचा राग येत आहे.काँग्रेसने प्राण प्रतिष्ठाच्या निमंत्रणाला नकार दिला.नकली शिवसेनेनेही तोच मार्ग अवलंबला.जेव्हा काँग्रेसचे लोक राम मंदिराबाबत काहीही बोलत होते तेव्हा नकली शिवसेनेवाले तोंड बंद करून गपचूप बसले होते.दोन्ही पक्ष पापांचे भागिदार आहेत. महाराष्ट्राला नकली शिवसेना काय आहे ते कळलं आहे. वीर सावरकरांची दिवसरात्र निंदा करणाऱ्या काँग्रेस पक्षाला नकली शिवसेनेचे लोक डोक्यावर घेऊन नाचत आहेत.महाराष्ट्राची स्वाभिमानी जनता हे पाहते तेव्हा लोकांच्या मनातील राग अधिकच वाढतो.नकली शिवसेनेने काँग्रेसपुढे गुडघे टेकले आहेत.महाराष्ट्राच्या जनतेने या नकली शिवसेनेला धडा शिकवण्याचा निर्णय घेतला आहे, असे पंतप्रधान मोदी म्हणाले.