24 C
Mumbai
Monday, December 23, 2024
घरराजकारणसंसदीय दलाचे नेते म्हणून नरेंद्र मोदींची एकमताने निवड

संसदीय दलाचे नेते म्हणून नरेंद्र मोदींची एकमताने निवड

एनडीएच्या नवनिर्वाचित खासदारांची बैठक

Google News Follow

Related

भाजपा नेते नरेंद्र मोदींची संसदीय पक्ष आणि एनडीए नेतेपदी निवड होत असल्याची घोषणा भाजपाचे पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी नड्डा यांनी केली. एनडीएमधील सर्व घटक पक्षांनी याला एकमताने पाठींबा दिला. सत्तास्थापनेपूर्वी नवनिर्वाचित खासदार आणि एनडीए पक्षातील नेत्यांची बैठक जुन्या संसद भवनच्या सेन्ट्रल हॉलमध्ये पार पडली.

यावेळी जे पी नड्डा म्हणाले की, “आपल्या सर्वांसाठी हा एक ऐतिहासिक क्षण आहे आणि आपण नरेंद्र मोदी यांची सलग तिसऱ्यांदा एनडीएचे नेते म्हणून निवड करणार आहोत. सर्वजण या ऐतिहासिक क्षणाचे प्रत्यक्षदर्शी आहोत. हे आपल्या सर्वांचे भाग्य आहे.” राजनाथ सिंह यांच्याकडून एनडीएनेते पदाचा प्रस्ताव मांडण्यात आला. सर्व देशवासीयांनी नरेंद्र मोदींची कार्यक्षमता, दूरदृष्टी आणि सत्यता प्रत्यक्ष पाहिली आहे. पुढील ५ वर्षे नरेंद्र मोदी यांनी नेतृत्त्व कारावं ही देशातील जनतेची इच्छा आहे, असे गौरवोद्गार काढत राजनाथ सिंह यांनी संसदीय पक्ष आणि एनडीए नेतेपदासाठी नरेंद्र मोदी यांच्या नावाचा प्रस्ताव मांडला.

नरेंद्र मोदी यांच्या नावाला अमित शहा आणि नितीन गडकरी या दोघांनीही अनुमोदन दिले आहे. तसेच टीडीपीचे चंद्राबाबू नायडू, बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार, महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार, लोक जनशक्ती पार्टीचे प्रमुख चिराग पासवान, हिंदुस्थानी आवाम मोर्चाचे प्रमुख जीतनराम मांझी, अपना दलच्या अनुप्रिया पटेल यांनी देखील नरेंद्र मोदी यांच्या नावाला सहमती दर्शवली.

हे ही वाचा:

पाकिस्तानविरोधातील अमेरिकेच्या विजयाचा शिल्पकार; सौरभ नेत्रावलकर आहे तरी कोण?

टी२० विश्वचषक स्पर्धेत अमेरिकेकडून पाकिस्तानला पराभवाचा धक्का!

सलग आठव्यांदा आरबीआयचा रेपो रेट जैसे थे स्थितीत

नरेंद्र मोदींच्या शपथविधी सोहळ्याला सफाई कर्मचारी, मजूर, केंद्रीय योजनांचे लाभार्थी उपस्थित राहणार

पंतप्रधान नरेंद्र मोदी हे एनडीएला बहुमत मिळाल्यानंतर केंद्रात तिसऱ्यांदा सत्ता स्थापन करणार आहेत. ‘एनडीए’च्या प्रमुखपदी नरेंद्र मोदी यांची एनडीएमधील घटक पक्षांनी एकमताने नियुक्ती केली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी हे ९ जून रोजी सायंकाळी ६ वाजता शपथ ग्रहण करणार आहेत. एएनआयने यासंदर्भात वृत्त दिले आहे. पंतप्रधान मोदी यांच्या शपथविधी सोहळ्याच्या तयारीसाठी ५ ते ९ तारखेपर्यंत राष्ट्रपती भवन पर्यटकांसाठी बंद असेल. तसेच हजारोंच्या संख्येने या सोहळ्यासाठी मान्यवर उपस्थित राहणार आहेत.

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

49,899चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
216,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा