पंतप्रधान मोदी रात्री १ वाजता बनारस रेल्वे स्टेशनवर

पंतप्रधान मोदी रात्री १ वाजता बनारस रेल्वे स्टेशनवर

पंतप्रधान नरेंद्र मोदी हे दोन दिवसांसाठी वाराणसी दौऱ्यावर आहेत. सोमवारी (१३ डिसेंबर) काशी विश्वनाथ धामचे उद्घाटन केल्यानंतर नरेंद्र मोदी यांनी प्रोटोकॉल बाजूला ठेवत काल रात्री एक वाजताच्या सुमारास बनारस रेल्वे स्थानकाला भेट दिली. मोदींनी उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्या सोबत स्थानकाची पाहणी केली. तसेच त्यांनी गोडोलिया चौकालाही भेट दिली.

नरेंद्र मोदी यांनी बनारस रेल्वे स्थानकाचे फोटो शेअर करत पुढचा थांबा, बनारस स्टेशन असे लिहिले असून आम्ही रेल्वे कनेक्टिव्हिटी वाढवण्याबरोबरच स्वच्छ, आधुनिक आणि प्रवासी अनुकूल रेल्वे स्थानके प्रवाशांसाठी उपलब्ध करून देण्यासाठी काम करत आहोत, असे म्हटले आहे. यावेळी पंतप्रधान मोदींसोबत योगी आदित्यनाथही उपस्थित होते. त्यांनी वाराणसीच्या विकासकामांची पाहणी केली.

हे ही वाचा:

पटोले हतबल, त्यांनी आता राजीनामा द्यावा!

‘हा विजय म्हणजे महाविकास आघाडीला चपराक’

अकोल्यात शिवसेनेला धक्का; वसंत खंडेलवाल विजयी

नागपूरच्या जागेवर चंद्रशेखर बावनकुळे यांची बाजी

पंतप्रधानांचा ताफा गोडोलिया चौकात थांबल्यानंतर ते येथे उतरले आणि गोदौलिया-दशाश्वमेध रस्त्याचे विकास काम पाहण्यासाठी मुख्यमंत्री योगी यांच्यासह पायी निघाले. रात्रभर गजबजणाऱ्या गोडोलिया चौकात अचानक पंतप्रधान आणि मुख्यमंत्र्यांना पाहून लोकांना आश्चर्य वाटले. तेथून नरेंद्र मोदी आणि योगीजी काशी विश्वनाथ धामकडे रवाना झाले.

Exit mobile version