संत रविदास जयंतीनिमित्त पंतप्रधान मोदी भजनात रमले

संत रविदास जयंतीनिमित्त पंतप्रधान मोदी भजनात रमले

महान हिंदू संत रविदास यांची आज जयंती आहे. संत रविदास यांच्या जयंतीनिमित्त देशभर उत्सव साजरा केला जात आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी रविदास जयंतीनिमित्त दिल्लीतील श्री गुरु रविदास विश्राम धाम मंदिराला भेट दिली आणि आदरांजली अर्पण केली. दिल्लीच्या या श्री गुरू रविदास विश्राम धाम मंदीरात पंतप्रधान नरेंद्र मोदी हे भजन करताना दिसुन आले. त्यांचा एक व्हिडीओ त्यांनी ट्वीटरवर शेअर केला आहे.

श्री गुरु रविदास विश्राम धाम मंदिरामध्ये नरेंद्र मोदींनी भजनाच्या कार्यक्रमात सहभाग घेतला. यावेळी त्यांनी भक्तांसोबत वाद्य देखील वाजवले. भजन गाणाऱ्या भक्तांसोबत मोदींनी भक्ती भावाने त्या क्षणाचा आनंद घेतला. नरेंद्र मोदींनी देशवासियांना देखील रविदास जयंतीच्या शुभेच्छा दिल्या.

संत रविदास हे सुधारक संतांमध्ये अग्रणी होते. ते कुलभूषण कवी होते तसेच तत्कालीन प्रचलित सामाजिक विद्वान होते. त्यांच्या गुरुग्रंथ साहेबमध्ये असलेल्या रचना आजही लोकप्रिय आहेत. त्यांचे योगदान लक्षणीय आहे. ते कवी- संत, समाजसुधारक आणि आध्यात्मिक व्यक्तिमत्त्व होते. रविदासांच्या भक्तिगीतांचा पंजाब, राजस्थान, महाराष्ट्र, मध्य प्रदेश, उत्तर प्रदेश या राज्यांमध्ये गुरू म्हणून प्रभाव आहे.

हे ही वाचा:

‘२५ हजार कोटींचा घोटाळा झाला म्हणताय, मग तुम्ही काय दोन वर्ष झोपला होता का?’

‘संजय राऊत यांना तात्काळ राज्यसभेतून निलंबित करा’

भारत की वेस्ट इंडिज? कोण ठरणार टी-२० चा दादा?

‘त्या १९ बंगल्यांचा कर रश्मी उद्धव ठाकरे आणि मनीषा रवींद्र वायकर भरतायत’

Exit mobile version