पंतप्रधान नरेंद्र मोदी हे आज पुण्याच्या दौऱ्यावर आहेत. यावेळी नरेंद्र मोदी हे पुण्यातील अनेक विकासकामांचे उद्घाटन करणार आहेत. सर्वप्रथम नरेंद्र मोदी हे पुणे महानगरपालिकेत दाखल झाले होते. तेथे त्यांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचे अनावरण केले. त्यावेळी राज्यपाल भगतसिंग कोश्यारी, विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस, केंद्रीय मंत्री रामदास आठवले, उपमुख्यमंत्री अजित पवार, उद्योगमंत्री सुभाष देसाई महापौर मुरलीधर मोहोळ आदी नेते उपस्थित होते.
पुणे येथील विमानतळावरून नरेंद्र मोदी हे पुणे महानगरपालिकेत उभारण्यात आलेल्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचे अनावरण करण्यासाठी पोहचले. राज्यपाल राज्यपाल भगतसिंग कोश्यारी, विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस, सुभाष देसाई यांनी नरेंद्र मोदी यांचे विमानतळावर त्यांचे स्वागत केले. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे मात्र या कार्यक्रमाला अनुपस्थित होते. शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचं अनावरण केल्यानंतर पंतप्रधान मोदी महाराजांच्या पुतळ्याजवळ गेले. यावेळी त्यांनी महाराजांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण केले आणि छत्रपती शिवरायांना अभिवादन केले. छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचे अनावरण झाल्यावर पुण्याचे महापौर मुरलीधर मोहोळ यांनी नरेंद्र मोदी यांना फेटा घालून आणि त्यांना शिवाजी महाराजांनी मूर्ती देऊन सत्कार केला. त्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा ताफा गरवारे मेट्रो स्टेशनवर रवाना झाला.
हे ही वाचा:
‘दिशा, सुशांत प्रकरणाबद्दल बोलू नका सांगायला मुख्यमंत्र्यांचा दोन वेळा फोन’
पंतप्रधान मोदींच्या स्वागतासाठी खास फेटा
चार राज्यात भाजपा सरकार स्थापन करणार
मणिपूरमध्ये नेत्याच्या घरावर बॉम्ब हल्ला
नरेंद्र मोदी यांना घालण्यात आलेल्या खास फेट्याची निर्मिती मुरुडकर झेंडेवाले यांनी केली. पंतप्रधान नरेंद्र मोदी जनतेला सोबत घेऊन देशाचा विकास करत आहेत. त्यांना आपला देश महासत्ता बनवण्यासाठी अजून ताकद मिळावी या विचाराने पुण्यातील मुरुडकर झेंडेवाले यांनी नरेंद्र मोदी यांच्यासाठी आकर्षक राजबिंडा शाही फेटा तयार केला.