पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज सायंकाळी धार्मिक विधींमध्ये सहभाग घेत २१६ फूट उंच स्टॅच्यू ऑफ इक्वॅलिटीचे अनावरण केले आहे. यावेळी पंतप्रधानांनी भक्तीमय सोनेरी पोशाख परिधान केलेला होता. पंतप्रधान मोदी यांनी प्रार्थनास्थळी बसून भक्तीभावाने पूजाअर्चा पार पडली आणि नंतर त्यांनी मंदिर परिसराचा फेरफटका मारला जिथे बद्रीनाथ, अयोध्या, तिरुमलासह १०८ विष्णू मंदिरांच्या प्रतिकृती ठेवण्यात आल्या आहेत.
या अनावरण सोहळ्यात तब्बल १ हजार ३५ हवनकुंडांमध्ये १४ दिवस आधीपासून महायज्ञ सुरू होते. यासाठी विविध राज्यातून सुमारे दोन लाख किलो तूप आणले होते. २१६ फूट उंच असलेला हा पुतळा ११व्या शतकातील भक्ती संत श्री रामानुजाचार्य यांची आहे. ज्यांनी त्या काळात विश्वास, जात आणि पंथ यासह जीवनाच्या सर्व पैलूंमध्ये समानतेच्या कल्पनेचा प्रचार केला.
हे ही वाचा:
लता मंगेशकर यांची प्रकृती चिंताजनक; व्हेंटिलेटरवर ठेवले
स्टार प्रचारकांच्या यादीतून काँग्रेसने गुलाम नबी यांना केले ‘आझाद’
‘संजय राऊत मित्र परिवाराने १०० कोटींचा जम्बो कोविड सेंटर घोटाळा केला’
मुंबई महापालिका निवडणुकीसाठी भाजपची बांधणी
हा पुतळा पद्मासनात हात जोडून बसलेल्या स्थितीत आहे. सोने, चांदी, तांबे, पितळ आणि जस्त या पाच धातूंच्या मिश्रणाने ‘पंचलोहा’ ही मूर्ती बनविली गेली आहे. बसलेल्या स्थितीत जगातील सर्वात उंच धातूच्या मूर्तींपैकी एक आहे. या मूर्तीला ‘भद्र देवी ‘ असे नाव देण्यात आले आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी उद्घाटनाच्या काही तास आधी, ट्विट केले की २१६ फूट उंच पुतळा हा श्री रामानुजाचार्य यांना योग्य श्रद्धांजली आहे. ज्यांचे पवित्र विचार आणि शिकवण आपल्याला प्रेरित करते.