नरेंद्र मोदींनी खासदारांना सांगितलं, मोदीजी नका म्हणू मोदी म्हणा

भाजपाच्या संसदीय सदस्यांच्या बैठकीत केले आवाहन

नरेंद्र मोदींनी खासदारांना सांगितलं, मोदीजी नका म्हणू मोदी म्हणा

पाच राज्यांमध्ये झालेल्या विधानसभा निवडणुकीत राजस्थान, मध्य प्रदेश आणि छत्तीसगडमध्ये भाजपाने दमदार विजय मिळवला. त्यानंतर हा आपला सांघिक विजय असून आगामी निवडणुकीत पक्षाच्या कार्यकर्त्यांनी नवी आव्हाने स्वीकारण्यासाठी तयार रहावे, असे आवाहन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गुरुवार, ७ डिसेंबर रोजी भाजपाच्या संसदीय सदस्यांच्या बैठकीत केले.

संसदेचे हिवाळी अधिवेशन सध्या सुरू असून त्यानिमित्ताने नेहमीप्रमाणे भाजपाच्या खासदारांची बैठक सपन्न झाली. या बैठकीला पंतप्रधान मोदी येताच, सर्व खासदारांनी उभे राहून घोषणाबाजी करत, टाळ्या वाजवत त्यांचे स्वागत केले. द इंडियन एक्सप्रेसने सूत्रांच्या माहितीच्या आधारे सांगितले की, “पंतप्रधान मोदी यांनी सर्व खासदारांना ‘मोदीजी’ न बोलण्याचे आवाहन केले आहे. लोक मला मोदी या नावाने ओळखतात. त्यामुळे खासदारांनी मला मोदीजी किंवा आदरणीय मोदीजी म्हणून संबोधित करू नये. मी आजही पक्षाचा एक छोट कार्यकर्ता आहे. मी जनतेच्याच कुटुंबाचा एक भाग आहे, असे मी समजतो. लोकांना मोदी म्हणून मी जवळचा वाटतो, त्यामुळे माझ्या नावापुढे श्री किंवा आदरणीय असे काही लावू नका.”

तीन राज्यातील विधानसभा निवडणुकीमध्ये विजय मिळविल्यानंतर ही पहिलीच संसदीय सदस्यांची बैठक झाली. यावेळी भाषणात पंतप्रधान मोदी म्हणाले की, तीन राज्यात मिळालेल्या विजयामुळे हे निश्चित झाले की, आपल्या कामाच्या आधारावर आपण पुन्हा सत्ता मिळवू शकतो. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, पंतप्रधान मोदी भाषणात म्हणाले की, सलग दोनदा सत्ता मिळविण्यात भाजपाचे प्रमाण इतर पक्षांच्या तुलनेत ५७ टक्के एवढा आहे. काँग्रेसचे दुसऱ्यांदा सत्ता मिळविण्याचे प्रमाण २० टक्क्यांच्याही खाली आहे. भाजपाचे तिसऱ्यांदा सत्ता मिळविण्याचे प्रमाण ५९ टक्के आहे, तर काँग्रेसने हल्लीच्या काळात कोणत्याही राज्यात एकदाही तिसऱ्यांदा सत्ता स्थापन केलेली नाही.

हे ही वाचा:

मद्य कंपनीवर धाड, नोटा मोजता मोजता यंत्रे बिघडली!

स्वानंद किरकिरे आणि ‘ऍनिमल’ टीममध्ये जुंपली!

तीन राज्यांत महिलाशक्ती? मुख्यमंत्री किंवा उपमुख्यमंत्री महिला होण्याची शक्यता

लग्नात हुंडा मागितल्याने केरळच्या २६ वर्षीय महिला डॉक्टरची आत्महत्या!

केंद्र सरकारच्या योजना आणि त्याच्या लाभार्थ्यांचा प्रचार करण्यासाठी केंद्र सरकारच्या वतीने विकसित भारत संकल्प यात्रा सुरू करण्यात आलेली आहे. नरेंद्र मोदी यांनी सर्व खासदारांना या यात्रेत सक्रिय सहभाग नोंदविण्याची सूचना केली आहे.

Exit mobile version