भारत देश हा पहिल्यापासूनच व्यक्तीपूजक राहिलेला आहे. भारतात अनेक व्यक्तींना त्यांच्या कर्तृत्वाच्या जोरावर पूजनीय स्थान दिले जाते. अनेकदा भावनिकरित्या लोक या व्यक्तींची इतके संबंध जोडतात की त्यांना देवाच्या स्वरूपात पाहू लागतात आणि मग देव म्हटले की त्याचे मंदिर या भाविकांना उभारावे असे वाटू लागते.
भारताचे विद्यमान पंतप्रधान नरेंद्र मोदी हे देखील अशाच प्रकारे त्यांच्या कार्यामुळे करोडो भारतीयांच्या गळ्यातील ताईत बनले आहेत. विविध कारणांमुळे लोक नरेंद्र मोदींना श्रद्धेय मानतात. तर काही जणांसाठी मोदी हे देवाचाच अवतार आहेत. पुण्यातील अशाच एका भाविकाने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे मंदिर उभारले आहे.
पुण्यातील औंध भागात हे मंदिर उभारण्यात आले आहे. मयूर मुंडे नामक एका इसमाने मोदींचे हे मंदिर उभारले आहे. मयूर हे भारतीय जनता पार्टीचे पुण्यातील एक कार्यकर्ते आहेत. औंध परिसरातील त्यांच्या स्वतःच्या मालकीच्या जागेवर त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींचे हे अनोखे मंदिर उभारले आहे.
हे ही वाचा:
पोलीस महासंचालकांचेच बनवले बनावट फेसबुक अकाऊंट
लोकसंगीताला अधिक उजळवणार पवनदीप
आता या माध्यमातून अमेरिकेची तालिबानवर कारवाई?
अश्रफ घनी यांच्यानंतर ‘या’ महत्वाच्या व्यक्तीनेही देश सोडला
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या कार्यकाळात अयोध्येतील राम जन्मभूमीवर प्रभू श्रीरामांचे भव्य राम मंदिर उभे राहत आहे. पंतप्रधान मोदी यांच्या प्रयत्नामुळेच हे शक्य झाले आहे. त्यामुळेच आपण नरेंद्र मोदी यांचे मंदिर बांधले असल्याचे मयूर मुंडे यांनी सांगितले आहे. मुंडे हे मागील वीस वर्षांपासून भारतीय जनता पार्टीचे सक्रीय कार्यकर्ते आहेत. त्यांनी हे मोदींचे मंदिर स्वखर्चाने उभारले आहे.
नरेंद्र मोदींचे हे मंदिर पुण्यातील आणि महाराष्ट्रातील पहिलेच असे मंदिर आहे. पण देशातील मात्र हे पहिले मंदिर नाही. या आधी गुजरातमधील राजकोट मध्ये आणि तमिळनाडूमध्ये तिथल्या स्थानिक नागरिकांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे मंदिर उभारले आहे.