‘कोरोनाला हरवण्यासाठी दिलेल्या लढ्याचे श्रेय जनतेचे’

‘कोरोनाला हरवण्यासाठी दिलेल्या लढ्याचे श्रेय जनतेचे’

पंतप्रधान नरेंद्र मोदी हे राष्ट्रपतींच्या अभिभाषणावर उत्तर देताना बोलले की, कोरोनाच्या संकटाला आपण ज्या प्रकारे तोंड दिले ते देशाच्या जनतेचे श्रेय आहे. कोरोना काळातील संकटाचा सामना जनतेने केला आहे मात्र, त्याचे श्रेय घेण्याचा प्रयत्न अनेक राजकीय नेत्यांनी घेण्याचा प्रयत्न केला, असे पंतप्रधान मोदी संसदेत बोलताना म्हणाले.

गेल्या १०० वर्षात लोकांनी इतके मोठे संकट पाहिले नाही. संकाटाची तीव्रता मोठी होती. पूर्ण देश कोरोनाच्या विरोधात लढा देत आहे. भारताने कोरोनाला हरवण्यासाठी केलेल्या प्रयत्नांची स्तुती जगात होत आहे आणि कोणा एका राजकीय पक्षाचे हे श्रेय नाही. हे जनतेचे श्रेय आहे. पण, काही राजकीय पक्ष याचे श्रेय लाटण्याचा प्रयत्न करतात, असा टोला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लगावला आहे.

आपली अर्थव्यवस्था ही हाय ग्रोथ आणि मिनिमम इन्फ्लेशनला सामोरे जात आहे. २०१४ ते २०२० मध्ये महागाईचा दर ४ ते ५ टक्के आहे. युरो करन्सी जिथे आहे तिथे महागाईचा दर अधिक आहे. अमेरिकेत ४० वर्षातील सर्वाधिक महागाई असून ब्रिटनमध्ये ३० वर्षातील सर्वाधिक महागाई आहे, असे मोदींनी सांगितले.

२०१४ ला सत्ता गेल्याने डोळ्यासमोर काजवे चमकले आहेत, असा टोला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काँग्रेसला लगावला आहे. देशाच्या सामर्थ्याला कमी लेखू नका. काही लोकांना भारताचे यश भारताचे वाटत नाही. तसेच लसीकरणावर व्यर्थ खर्च होत असल्याचे बोलले जात आहे. सर्वांना सोबत घेण्याचा आम्ही प्रयत्न केला, असेही नरेंद्र मोदी म्हणाले.

हे ही वाचा:

मुंबई १०० टक्के अनलॉक होणार?

महाभारत मालिकेतील ‘भीम’ प्रविणकुमार यांचे निधन

अहमदाबाद संघाचे झाले बारसे…’हे’ असणार नाव

देशाची थट्टा उडवता, म्हणून काँग्रेस थट्टेचा विषय बनला आहे!

कोरोना महामारीच्या काळात प्रत्येक तरुणाने चांगले काम केले. क्रीडा क्षेत्रात सर्व तरुण खेळाडूंनी देशाचा सन्मान वाढवला आहे. स्टार्टअप क्षेत्रात देखील खूप भारताला टॉप ३ मध्ये जागा मिळाली आहे. हे फक्त तरुणांमुळे शक्य झालं आहे. ५ कोटी कुटुंबांना नळ योजनेद्वारे पाणी दिलं.आयुष मंत्रालयाने खूप चांगली कामे केली, असे नरेंद्र मोदी म्हणाले.

Exit mobile version