संदेशखालीनंतर बंगालमधला ज्वालामुखी कधीही फुटेल!

नरेंद्र मोदींचा मुलाखतीमधून ममता बॅनर्जी सरकारवर जोरदार हल्ला

संदेशखालीनंतर बंगालमधला ज्वालामुखी कधीही फुटेल!

लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर देशात सध्या प्रचार सभांना वेग आला असून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही विविध राज्यांमध्ये सभांचा धडाका लावला आहे. अशातच ते विविध माध्यमांना मुलाखती देऊन विरोधकांनी केलेल्या आरोपांना सडेतोड उत्तर देण्याचे कामही करत आहेत. नुकतीच नरेंद्र मोदी यांनी ‘रिपब्लिक मीडिया’ला मुलाखत दिली. या मुलाखतीत नरेंद्र मोदी यांनी पश्चिम बंगालमधील संदेशखाली येथील महिलांवर स्थानिक टीएमसी नेत्यांनी केलेल्या अत्याचाराबाबत पश्चिम बंगालमधील ममता बॅनर्जी यांच्या नेतृत्वाखालील टीएमसी सरकारवर जोरदार हल्ला चढवला.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या मुलाखतीत विविध विषयांवर चर्चा केली. तसेच विरोधकांनी केलेल्या खोट्या आरोपांना त्यांनी चोख उत्तरेही दिली. संदेशखाली हे पश्चिम बंगालमधील कुशासनाचे प्रतीक बनले आहे का? असा प्रश्न मुलाखत घेताना अर्णब गोस्वामी यांनी विचारला होता. यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले की, “इतिहास पाहता पश्चिम बंगाल आणि तामिळनाडूने संकटाच्या काळात अनेक वेळा देशाचे नेतृत्व केले आहे. संकटातून देशाला बाहेर काढले आहे. पण, दुर्दैवाने पश्चिम बंगाल आणि तामिळनाडू हे दोन्ही तेथील कुटील राजकारणाचे बळी ठरले आहेत,” असं दुःख नरेंद्र मोदी यांनी व्यक्त केलं आहे.

“ममता बॅनर्जी या पूर्वी पश्चिम बंगालमध्ये डाव्यांचे सरकार असताना संसदेत डाव्यांविरोधात आवाज उठवत होत्या आणि त्याच मुद्द्यांवर आज आम्ही बोलत आहोत. ममता बॅनर्जी आह तेच करत आहेत जे यापूर्वी डावे आणि काँग्रेसने केले आहे. यात गुन्हेगारी हा एक मुद्दा अजून जोडला गेला आहे. संदेशखालीमधील घटना ही दिसायला छोटी आहे पण संपूर्ण पश्चिम बंगालमध्ये पश्चिम बंगालमध्ये भयंकर ज्वालामुखी आहे आणि हा ज्वालामुखी कधी फुटेल हे सांगता येत नाही,” असे म्हणत नरेंद्र मोदींनी बंगालमधील सध्याच्या परिस्थितीची तुलना ज्वालामुखीशी केली.

हे ही वाचा:

रिकामं डोकं कुलगुरूंची अक्कल काढते तेव्हा..

झारखंडचे माजी मुख्यमंत्री हेमंत सोरेन यांना अंतरिम जामीन नाहीच

पाकव्याप्त काश्मीर जम्मू काश्मीरमध्ये निदर्शने

जिवंतपणी काय मृत्यूनंतरही तुम्ही मला जमिनीत गाडू शकत नाहीत!

“सध्या पश्चिम बंगालमध्ये जे सुरू आहे ते त्यांनी अगदीच सामान्य आहे असे दाखवून ठेवले आहे. पण, देशासाठी हा चिंतेचा विषय आहे. बंगालमध्ये दडपशाही आणि व्होटबँकेचे राजकारण आहे. ममता बॅनर्जी या देशाच्या कायद्याचे पालन करण्यावर विश्वास ठेवत नाहीत. त्यांना नोकऱ्या किंवा उत्पन्नाची पर्वा नाही. तिथे नवे प्रकल्प गुंतवणूक करत नाहीत. ममता बॅनर्जी आणि डाव्यांनी बंगालला उद्ध्वस्त केले आहे. तिकडची महान संस्कृती यामुळे गमावत आहोत आणि याचे दुःख झाले आहे,” अशा भावना नरेंद्र मोदी यांनी व्यक्त केल्या आहेत.

Exit mobile version