दहशतवाद्यांना पाठीशी घालण्यावरून नरेंद्र मोदींनी केले ‘सायकल’ला लक्ष्य

दहशतवाद्यांना पाठीशी घालण्यावरून नरेंद्र मोदींनी केले ‘सायकल’ला लक्ष्य

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी रविवारी २० फेब्रुवारी रोजी उत्तर प्रदेशातील हरदोई येथे जाहीर सभा घेतली. या भाषणादरम्यान नरेंद्र मोदी यांनी अहमदाबाद बॉम्बस्फोट प्रकरणाचा संदर्भ देत समाजवादी पक्षावर टीकास्त्र सोडले. काही राजकीय पक्षांनी दहशतवाद्यांवर मेहरबानी केली होती आणि ही बाब देशाच्या सुरक्षेच्या दृष्टीने अत्यंत धोक्याची आहे, असे नरेंद्र मोदी म्हणाले.

अहमदाबादमध्ये बॉम्बस्फोट घडवण्यात आला तेव्हा दहशतवाद्यांनी सायकलवर हे बॉम्ब ठेवल्याचे त्यांनी म्हटले. तसेच या सायकली त्यांनी गर्दीच्या ठिकाणी ठेवल्या आणि बॉम्बस्फोट घडवून आणले, असेही नरेंद्र मोदी म्हणाले. तसेच यापूर्वी २०१३ मध्ये समाजवादी पक्षाचे सरकार सत्तेवर आले तेव्हा या लोकांनी शमीम अहमद नावाच्या आरोपीवरील खटले मागे घेण्याचा निर्णय घेतला होता, असा आरोप पंतप्रधानांनी केला. अहमदाबाद प्रकरणातही त्यांना दिलासा द्यायचा होता. पण तब्बल वीस वर्षांनी यावर न्यायालयाचा निर्णय आला आहे. समाजवादीने दहशतवाद्यांना दया दाखवण्याचा प्रयत्न केला होता मात्र, आता देशातील जनता त्यांना सहन करणार नाही, असेही पंतप्रधान मोदी म्हणाले.

हे ही वाचा:

राणेंच्या ‘अधिश’वर पुन्हा महापालिकेचं पथक दाखल 

‘सुडाचे राजकारण कोण करते आहे ते जनता बघत आहे’

बजरंग दलाच्या कार्यकर्त्याची कर्नाटकमध्ये हत्या

लालूप्रसाद यादवांच्या शिक्षेवर आज सुनावणी

“२००७ मध्ये लखनऊ, अयोध्या येथील न्यायालय परिसरात बॉम्बस्फोट झाले होते. २०१३ मध्ये समाजवादी सरकारने तारिक काझमी नावाच्या दहशतवाद्यावरील खटला मागे घेतला. मात्र या प्रकरणातही न्यायालयाने समाजवादी सरकारचे कारस्थान चालू दिले नाही आणि त्या दहशतवाद्याला जन्मठेपेची शिक्षा सुनावली,” असे नरेंद्र मोदी म्हणाले. त्याचप्रमाणे उत्तर प्रदेशमध्ये एक-दोन नव्हे तर १४ दहशतवादी हल्ल्यांच्या प्रकरणांमध्ये समाजवादी सरकारने अनेक दहशतवाद्यांवरील खटले मागे घेण्याचे आदेश दिले होते. हे लोक स्फोट घडवत होते आणि समाजवादी पक्षाचे सरकार या दहशतवाद्यांवर कारवाईही होऊ देत नव्हते, असा घाणाघाटी आरोप नरेंद्र मोदी यांनी केला आहे.

Exit mobile version