मविआच्या गाडीला ना चाके, ना ब्रेक तरीही चालकाच्या सीटवर बसण्यासाठी भांडणे सुरू

पंतप्रधान नरेंद्र मोदींनी धुळ्यातून साधला निशाणा

मविआच्या गाडीला ना चाके, ना ब्रेक तरीही चालकाच्या सीटवर बसण्यासाठी भांडणे सुरू

राज्यात विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर प्रचाराला वेग आला असून पंतप्रधान नरेंद्र मोदींनी आज महाराष्ट्रातील धुळ्यात पहिली प्रचारसभा घेतली. यावेळी त्यांनी महाविकास आघाडीवर जोरदार निशाणा साधत महायुतीने केलेली विकासकामे आणि योजना जनतेसमोर मांडल्या.

नरेंद्र मोदी म्हणाले की, जेव्हा मी महाराष्ट्राकडे पाठिंबा मागितला आहे, तेव्हा जनतेने नेहमीच उदारपणे त्यांचे आशीर्वाद दिले आहेत. २०१४ च्या विधानसभा निवडणुकीदरम्यान मी धुळ्यात आलो होतो आणि भाजपच्या विजयासाठी विनंती केली. तुम्ही सर्वांनी भाजपला यश मिळवून दिले होते. गेल्या अडीच वर्षात महायुती सरकारने रेकॉर्ड कामं केली आहेत. एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली महाराष्ट्राला गौरव पुन्हा मिळाला आहे. भाजपा- महायुती आहे तर गती आहे, महाराष्ट्राची प्रगती आहे, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला आहे. शिवाय महायुतीने दिलेल्या वचननाम्याचेही त्यांनी कौतुक करत अभिनंदन केले आहे. महाराष्ट्राला संजीवनी देण्यासाठी वचननामा दिल्याचे पंतप्रधान मोदी म्हणाले.

पुढे बोलताना नरेंद्र मोदींनी मविआवर निशाणा साधला आहे. महाविकास आघाडीच्या गाडीला चाके नाहीत, ब्रेक नाहीत. चालकाच्या सीटवर बसण्यासाठी त्यांच्यामध्ये भांडणे सुरू आहेत, असा खोचक टोला नरेंद्र मोदी यांनी महाविकास आघाडीला लगावला आहे. महाविकास आघाडी सरकारने मागील अडीच वर्षात आधी सरकारला लुटले आणि नंतर जनतेला लुटले. मविआने विकासकामे थांबवली. मेट्रोची कामे रोखली. समृद्धी महामार्गाचे काम थांबवले. महाराष्ट्रातील विकासाची प्रत्येक योजना थांबवली. पुढे राज्यात महायुतीचे सरकार आले आणि अडीच वर्षांत चौफेर विकास झाला. आता महाराष्ट्रातील मतदारांनी लक्षात ठेवा महायुती आहे तर गती आहे, महाराष्ट्राची प्रगती आहे, असं नरेंद्र मोदी म्हणाले.

हे ही वाचा : 

भारताने रशियाकडून तेल खरेदी करून जगावर उपकार केले नाहीतर…

मी कोणतीही मुलाखत दिलेली नाही! भुजबळांनी राजदीपच्या पुस्तकातील दावे फेटाळले

जम्मू- काश्मीरमधील सोपोरमध्ये दोन दहशतवाद्यांचा खात्मा

जम्मू- काश्मीर अधिवेशन: पाचव्या दिवशीही कलम ३७० च्या मुद्द्यावरून गदारोळ

विकसित महाराष्ट्र, विकसित भारतासाठी आमच्या बहिणींचे जीवन चांगले बनवणे गरजेचे आहे. त्यामुळे मागील दहा वर्षांत केंद्र सरकारने महिलांना मध्यभागी ठेऊन काम केले. महिलांसाठी आम्ही सर्व दरवाजे उघडले. त्यांना अधिकार दिले. महाराष्ट्राची महायुती सरकार केंद्राच्या पावलावर पाऊल ठेवून काम करत आहे. महाराष्ट्राच्या मुख्यमंत्री मुख्यमंत्री लाडकी बहिण योजनेची चर्चा सर्वत्र होत आहे. काँग्रेस ही योजना बंद करण्याचा प्रयत्न करत आहे. त्यासाठी ते न्यायालयात पोहचले आहेत. त्यांची सत्ता आली तर सर्वप्रथम ही योजना ते बंद करतील, असं नरेंद्र मोदी म्हणाले.

Exit mobile version