पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज राज्यसभेत केलेल्या भाषणात काँग्रेसवर जोरदार निशाणा साधला. पार्टीमध्ये कुटुंब शक्तिशाली असते त्यावेळी टॅलेंटची कमी असते, असा टोला पंतप्रधान मोदींनी लगावला आहे. घराणेशाहीच्या पुढे काँग्रेसने कधीही विचार केला नाही. काँग्रेस नसती तर आणीबाणीचा कलंक देशाला लागला नसता. १९७५ मध्ये लोकशाहीचा गळा घोटण्याचे काम केले गेले, अशी टीका नरेंद्र मोदी यांनी केली.
काँग्रेसमुळे देशाचे मोठे नुकसान झाले आहे. काँग्रेस नसती तर घराणेशाहीला आळा बसला असता, जातीयवाद संपला असता, शिखांचा नरसंहार झाला नसता, अशी घाणाघाती टीका नरेंद्र मोदी यांनी काँग्रेसवर केली आहे. काँग्रेसचे नाव बदलून माय-लेकाची काँग्रेस असे करा असा टोलाही नरेंद्र मोदींनी लगावला आहे. काँग्रेसला फक्त उपदेश देण्याची सवय आहे, असा आरोपही नरेंद्र मोदींनी केला.
भारताच्या लोकशाहीला सर्वात मोठा धोका हा घराणेशाही असेलेल्या पक्षाचा आहे. काँग्रेसमध्ये आजही घराणेशाही असून आता तरी काँग्रेसने पक्षात लोकशाहीचा अवलंब केला पाहिजे, असा टोला नरेंद्र मोदी यांनी लगावला.
हे ही वाचा:
९.४५ कोटींची संपत्ती असणारे चन्नी गरीब?
अहमदाबाद संघाचे झाले बारसे…’हे’ असणार नाव
देशाची थट्टा उडवता, म्हणून काँग्रेस थट्टेचा विषय बनला आहे!
काँग्रेस नसती तर काय चांगले झाले असते याची यादीच मोदींनी वाचून दाखवली. काँग्रेस सत्तेत असताना त्यांनी देशाचा विकास केला नाही आणि आता विरोधात आहे तर विकासात अडथळा आणत आहेत, असा आरोप नरेंद्र मोदी यांनी काँग्रेसवर केला.