काँग्रेसने सावरकर आणि बाळासाहेब ठाकरे यांची स्तुती करून दाखवावी!

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिले आव्हान

काँग्रेसने सावरकर आणि बाळासाहेब ठाकरे यांची स्तुती करून दाखवावी!

महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुकीसाठी भारताचे पंतप्रधान महायुतीच्या प्रचारार्थ महाराष्ट्रात आले होते. नाशिकमधील त्यांच्या दौऱ्यात त्यांनी काँग्रेसला आव्हान दिले की त्यांनी स्वातंत्र्यवीर सावरकर आणि हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांची स्तुती करून दाखवावी.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नाशिकच्या प्रचारसभेत वीर सावरकर आणि बाळासाहेब ठाकरे यांच्या कर्तृत्वाबद्दल सांगितले. त्याचवेळी काँग्रेसला आव्हानही दिले.
ते म्हणाले की, काँग्रेस ही स्वातंत्र्यवीर सावरकरांचा नेहमी अपमान करते. मी असे ऐकले आहे की काँग्रेसच्या युवराजांना (राहुल गांधी) मविआतील सदस्य पक्षांनी सांगितले की जर महाराष्ट्रातील निवडणूक जिंकायची असेल तर सावरकरांचा अपमान करू नका.

हे ही वाचा:

१८० हून अधिक स्वयंसेवी संस्थांच्या सहकार्याने सुरू आहे मुस्लीम मतदारांची नोंदणी

ब्रिटिशांनी जे षडयंत्र रचले नाही, ते राहुल गांधींनी रचले!

पुतीन म्हणतात, जागतिक महासत्तांच्या यादीत सामील होण्यास भारत पात्र

पूर्व उपनगरातील ५३ सराईत गुन्हेगारांना करण्यात आले तडीपार

 

मोदी म्हणाले की, मी मविआमधील पक्षांना आव्हान देतो की, स्वातंत्र्यवीर सावरकरांनी जो त्याग आणि जे समर्पण केले त्याचे कौतुक काँग्रेस नेते आणि युवराज यांनी करावे. युवराज हे कौतुक करण्याची हिंमत करू शकणार नाहीत.

पंतप्रधान म्हणाले की, सावरकरांनी त्या काळात स्वातंत्र्य चळवळीत अनेकांना देशासाठी त्याग करण्याची प्रेरणा दिली. पंतप्रधान म्हणाले की मी काँग्रेसला आव्हान देतो की त्यांनी सावरकरांनी भोगलेल्या काळ्या पाण्याच्या शिक्षेबद्दल त्यांच्यापुढे नतमस्तक व्हावे.

काँग्रेसने नेहमीच सावरकरांच्या योगदानाची खिल्ली उडवली. सावरकरांनी जातीयवादाचे राजकारण केले असे बिनबुडाचे आरोप काँग्रेस लावत राहिली. सावरकरांचा अपमान केल्याबद्दल राहुल गांधी यांच्यावर न्यायालयाने कारवाई केली होती, त्यामुळे राहुल गांधी यांना लोकसभेचे सदस्यत्व गमवावे लागले होते.

Exit mobile version