31 C
Mumbai
Thursday, January 9, 2025
घरराजकारण“देशात असलेल्या मजबूत सरकारमुळे दहशतवाद्यांना घरात घुसून मारलं जात आहे”

“देशात असलेल्या मजबूत सरकारमुळे दहशतवाद्यांना घरात घुसून मारलं जात आहे”

उत्तराखंडमधील सभेत पंतप्रधान नरेंद्र मोदींचे प्रतिपादन

Google News Follow

Related

देशात असलेल्या मजबूत सरकारमुळे दहशतवाद्यांना घरात घुसून मारलं जात आहे, असा घाणाघात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी त्यांच्या उत्तराखंड येथील भाषणात केला आहे. देशभरात सध्या लोकसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरु आहे. सर्वच राजकीय त्यांच्या पक्ष प्रचारात व्यस्त आहेत. दरम्यान, उत्तराखंडमधील ऋषिकेश येथे सभेला संबोधित करताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मागील काँग्रेस सरकारवर जोरदार हल्लाबोल केला आहे.

जेव्हा-जेव्हा देशात कमकुवत सरकार आले, तेव्हा देशात दहशतवाद पसरला आहे, अशी टीका नरेंद्र मोदी यांनी केली आहे. शिवाय आताच्या मजबूत सरकारमुळे दहशतवाद्यांना घरात घुसून मारलं जात आहे, असंही नरेंद्र मोदी म्हणाले. जम्मू-काश्मीरमध्ये सात दशकांपासून लागू असलेले कलम ३७० हटवण्यात आले, हे मजबूत सरकारमुळे होऊ शकले, असं नरेंद्र मोदी म्हणाले.

काँग्रेसचे सरकार कधीच ‘वन रँक-वन पेन्शन’ लागू करू शकलं नाही. मात्र, आताच्या सरकारने ते लागू केले. ‘वन रँक-वन पेन्शन’ सैनिकांचा सन्मान आहे, असे नरेंद्र मोदी म्हणाले. काँग्रेसच्या सरकारमध्ये जवानांच्या सुरक्षेसाठी उपकरणे नव्हती. बुलेटप्रुफ जॅकेटचीही कमतरता होती. पण, आज आधुनिक उपकरणे आहेत. सीमांवर आधुनिक रस्ते तयार होत आहेत. आधुनिक भूयार तयार होत आहेत, असे म्हणत त्यांनी केंद्र सरकारच्या कामाचा आलेख सांगितले. शिवाय हे दशक उत्तराखंडचे असल्याचे काही दिवसांपूर्वी बाबा केदारनाथांचे दर्शन घेताना बोललो होतो, अशी आठवणही त्यांनी सांगितली.

हे ही वाचा:

केजरीवालांचे स्वीय सचिव बिभव कुमार यांना पदावरून हटवले

पतंजलीला फटकारत सर्वोच्च न्यायालयाने माफीनामा फेटाळला

इस्रायलच्या हल्ल्यात हमासच्या नेत्याचे तीन मुलगे ठार

शुभमन गिल, राशिद खान यांनी साकारला गुजरातचा विजय

“काँग्रेसने हिंदू धर्मात असलेली शक्ती नष्ट करणार असल्याची प्रतिज्ञा घेतली आहे. विकास आणि वारसा या दोन्ही गोष्टींना काँग्रेसचा विरोध आहे,” अशी टीका पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केली आहे. तसेच, काँग्रेसने प्रभू रामाच्या अस्तित्वावर प्रश्न उपस्थित केला. राम मंदिराला विरोध केला. राम मंदिर होऊ नये म्हणून त्यांनी शक्य तितके अडथळे आणले. यानंतरही राम मंदिर बांधणाऱ्यांनी काँग्रेसचे सर्व गुन्हे माफ करून त्यांना अभिषेकासाठी बोलावले. पण त्यावरही काँग्रेसने बहिष्कार टाकला, असे नरेंद्र मोदी म्हणाले.

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

49,899चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
220,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा