“काँग्रेसची ओळख म्हणजे विश्वासघात”

धाराशिवमधून नरेंद्र मोदींचा काँग्रेस आणि विरोधकांवर हल्लाबोल

“काँग्रेसची ओळख म्हणजे विश्वासघात”

पंतप्रधान नरेद्र मोदींनी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्रात सभांचा धडाका लावला असून दोन दिवसात सहा सभा घेतल्या आहेत. धाराशिवमध्ये मंगळवारी दिवसातील दुसरी सभा घेत नरेंद्र मोदींनी काँग्रेस नेत्यांवर आणि इंडिया आघाडीवर हल्लाबोल केला आहे. महाराष्ट्राची कुलस्वामीनी आई तुळजाभवानीला नमन करतो, आई तुळजाभवानीने छत्रपती शिवाजी महाराजांना विजयी होण्याचा आशीर्वाद दिला होता. आज या धरतीवर आई तुळजाभवानी आणि जनताजनार्दनाकडून आशीर्वाद घेण्यासाठी आलोय, असे म्हणत नरेंद्र मोदींनी त्यांच्या सभेतील भाषणाला सुरुवात केली.

नरेंद्र मोदी म्हणाले की, “धाराशिवमधून एकेकाळी एकच ट्रेन धावत होती, आज दोन डझन रेल्वे येथून धावत आहेत. सोयाबिन उत्पादक शेतकऱ्यांना सांगू इच्छितो के, २०१४ पूर्वी १० वर्षात केवळ १२ हजार कोटी रुपयांचे दहलन, तिलहन काँग्रेस सरकारने खरेदी केला. तर, गेल्या १० वर्षात मोदी सरकारने जवळपास सव्वा लाख करोड रुपये दलहन, तिलहन शेतकऱ्यांना एमएसपीच्या माध्यमातून पोहोचवले आहे. एनडीए सरकारने काँग्रेस सरकारच्या तुलनेत १० पट जास्त पैसे दिले आहेत. हा केवळ ट्रेलर असून आता मोदींचे मिशन, हे देशाला तहलन व तिहलनमध्ये देशाला आत्मनिर्भर बनवणं आहे,” असे नरेंद्र मोदींनी म्हटलं आहे.

“मागच्या ६० वर्षात काँग्रेसने जगाकडे मदत मागितली. पण आजचा भारत जगाकडे भीक मागत नाही तर जगाला मदत करतो. काँग्रेसची एकच ओळख ती म्हणजे विश्वासघात. ६० वर्षात पाण्यासाठी काँग्रेसने जे केलं नाही ते १० वर्षात आम्ही केले. आजपर्यंत शेतकऱ्यांच्या वाट्याचे पैसे काँग्रेसच्या नेत्यांच्या खात्यात जात होते. पण मोदी सरकारने पीएम किसान योजनेच्या माध्यमातून शेतकऱ्यांच्या हक्काचे पैसे त्यांच्या खात्यात पोहचवले आहे. तसेच सोयाबीन उत्पादकांना काँग्रेसपेक्षा जास्त पैसे आम्ही दिले,” अशी टीका त्यांनी काँग्रेसवर केली.

हे ही वाचा:

छत्तीसगडमध्ये सुरक्षा जवानांसोबत चकमक, ७ माओवादी ठार!

शरद पवार कृषिमंत्री असताना काय केले?

नाशिक: एसटीची ट्रकला धडक, १० जण ठार!

‘मोदी पाठून हल्ला करत नाही जे करतो ते उघडपणे करतो’

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी इंडिया आघाडीवर निशाणा साधला. तसेच नरेंद्र मोदी हे समस्या टाळत नाही तर समस्यांशी लढतो, असा विश्वास असे म्हटले. तसेच नरेंद्र मोदी म्हणाले की, “मी तुमचे जीवन बदलण्यासाठी दिवस-रात्र एक करतोय तर हे इंडिया आघाडीवाले मला बदनाम करण्याचा प्रयत्न करत आहेत. विरोधक माझा वाईट प्रचार करत आहेत, ‘मोहब्बत कि दुकान’मध्ये फेक व्हिडीओ दाखवले जात आहेत. काँग्रेसची नजर ही तुमच्या मेहनतीच्या कमाई वर आहे,” अशी घाणाघाती टीका नरेंद्र मोदी यांनी केली आहे.

नरेंद्र मोदींनी प्रभू श्रीराम यांच्या मंदिरावर भाष्य करताना म्हटले की, “काँग्रेसच्या काळात या मंदिराचे निर्माण रोखण्यात आले. मोदी सरकारने प्रभू रामाचे मंदिर निर्माण केले असे म्हटले. तसेच राज्यातील नकली शिवसेना आणि नकली राष्ट्रवादीने राममंदिराचे निर्माण नाकारले.” अशी टीकाही नरेंद्र मोदी यांनी उद्धव ठाकरे आणि शरद पवारांवर केली.

Exit mobile version