लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर देशभरात सभांचा धडाका सुरू असून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सोमवार, १३ मे रोजी बिहारमधील मुजफ्फरपुरमध्ये जाहीर सभा घेतली. यावेळी त्यांनी काँग्रेसवर जोरदार निशाणा साधला. काँग्रेस नेते मणिशंकर अय्यर यांनी केलेल्या पाकिस्तान संबंधित वक्तव्याचा त्यांनी खरपूस समाचार घेतला.
विरोधक इतके घाबरलेले आहेत की यांना आता स्वप्नातही पाकिस्तानमधील अणुबॉम्ब दिसत आहे. इंडी आघाडीचे नेते काय वक्तव्य करत आहेत. पाकिस्तानने बांगड्या घातलेल्या नाहीत म्हणे. मग मी घालेन त्यांना बांगड्या. त्यांना पीठ हवे आहे, त्यांच्याकडे वीज नाही. आता आम्हाला हे माहीत नव्हतं की त्यांच्याकडे बांगड्याही नाहीत,” अशी सडकून टीका नरेंद्र मोदी यांनी काँग्रेस नेते आणि पाकिस्तानवर केली आहे.
पुढे नरेंद्र मोदी असेही म्हणाले की, “ही देशाची निवडणूक आहे, भारताचे भविष्य ठरवण्याची ही निवडणूक आहे. देशाचे नेतृत्व निवडण्याची ही निवडणूक आहे. देशाची धुरा कोणाच्या हातात द्यायची हे ठरवण्याची ही निवडणूक आहे. देशाला कमकुवत, भित्रा आणि अस्थिर काँग्रेस सरकार अजिबात नको आहे,” असा टोला नरेंद्र मोदी यांनी विरोधकांना लगावला आहे.
संपूर्ण बिहार आणि देशात भाजपा, एनडीएच्या बाजूने वादळ वाहत असल्याचे पंतप्रधान मोदी म्हणाले. बिहारमध्ये एक वेळ अशी होती की संध्याकाळी घराबाहेर पडणे कठीण होते, असं नरेंद्र मोदी म्हणाले. नरेंद्र मोदी म्हणाले की, “ज्या तरुण मतदारांनी पहिल्यांदा मतदान केले त्यांना जंगलराजची कहाणी किती भयंकर आहे हे माहित नसेल, त्यांनी त्यांच्या पालकांना, आजी-आजोबांना आणि इतर ज्येष्ठांना विचारावे. जंगलराजने बिहारला विकासाच्या बाबतीत अनेक दशके मागे सोडले. त्या काळात अनेक जिल्ह्यांमध्ये नक्षलवादाचाही प्रभाव होता, मात्र आता नक्षलवाद्यांचा प्रभाव कमी झाला आहे,” असं नरेंद्र मोदी आपल्या भाषणात म्हणाले.
हे ही वाचा:
‘तुम्ही ‘आप’ला मत दिल्यास मला पुन्हा तुरुंगात जावे लागणार नाही’
‘पेज थ्री संस्कृतीवर महाराष्ट्र चालवता येत नाही’
प्रशासनाच्या आदेशानंतरही गुजरातमधील जामनगरच्या रणजितसागर धरणावरील बेकायदा दर्गा ‘जैसे थे’
शादाब, शोएबकडून अल्पवयीन दलित मुलीचा विनयभंग!
“नरेंद्र मोदींनी तुम्हाला दुप्पट नफा मिळवून देण्यासाठी आणखी एक योजना आणली आहे. या योजनेमुळे तुमचे वीज बिल शून्य होईल. ‘पीएम सूर्यघर मोफत वीज योजना’ या अंतर्गत छतावर सोलर पॅनल बसवण्यासाठी सरकार तुम्हाला ७५ हजार रुपये देईल. तुम्हाला हवी तेवढी वीज वापरा, उरलेली वीज सरकारला विकली म्हणजे शून्य वीज बिल आणि त्यासोबत उत्पन्न,” अशी माहिती नरेंद्र मोदी यांनी दिली. “काँग्रेसच्या काळात एका एलईडी बल्बची किंमत ४०० रुपये होती, मोदींनी त्याची किंमत ४०-५० रुपये केली, असे म्हणत मोदींनी काँग्रेसवर निशाणा साधला आहे.