काँग्रेस आणि त्यांच्या मित्रपक्षांनी शेतकऱ्यांना गरीब करण्यात कोणतीही कसर सोडली नाही

वाशिममधून पंतप्रधान नरेंद्र मोदींचा काँग्रेस आणि महाविकास आघाडीवर जोरदार निशाणा

काँग्रेस आणि त्यांच्या मित्रपक्षांनी शेतकऱ्यांना गरीब करण्यात कोणतीही कसर सोडली नाही

काँग्रेस आणि त्यांच्या मित्रपक्षांच्या सरकारने शेतकऱ्यांना गरीब आणि दयनीय करण्यात कोणतीही कसर सोडली नाही. महाविकास आघाडीचे सरकार असेपर्यंत त्यांचे दोनच अजेंडे होते. पहिला, शेतकऱ्यांशी संबंधित प्रकल्प थांबवणे आणि दुसरे, या प्रकल्पांच्या पैशातून भ्रष्टाचार करणे, अशी सणसणीत टीका नरेंद्र मोदींनी आपल्या वाशिम दौऱ्यावेळीच्या भाषणातून महाविकास आघाडीवर केली. पंतप्रधान नरेंद्र मोदी हे आज महाराष्ट्र दौऱ्यावर असून त्यांनी वाशिममध्ये बंजारा समाजाचे श्रद्धास्थान असलेल्या पोहरादेवीचे दर्शन घेतलं. यावेळी आयोजित कार्यक्रमात बोलताना त्यांनी काँग्रेसवर जोरदार टीका केली.

काँग्रेसला केवळ जनतेची लूट कशी करायची हेच माहित आहे. काँग्रेस गरिबांना आणखी गरीब बनवण्याचा प्रयत्न करते आहे. गरीब भारत काँग्रेसच्या राजकारणासाठी फायदेशीर आहे. तसेच अर्बन नक्षलवादाला प्रोत्साहन देण्याचा प्रयत्नही काँग्रेसकडून केला जात आहे, असं म्हणत नरेंद्र मोदींनी काँग्रेसवर निशाणा साधला. ज्या लोकांना भारताचा विकास होऊ नये असं वाटतं तेच लोक आज काँग्रेसचे जवळचे मित्र आहेत, अशी टीकाही नरेंद्र मोदींनी केली. त्यामुळे जनतेने काँग्रेसापासून सावध राहायला हवं, असं आवाहनही पंतप्रधान मोदी यांनी केलं.

पुढे बोलताना नरेंद्र मोदी म्हणाले की, “दिल्लीत काही दिवसांपूर्वी कोट्यवधी रुपयांचे अंमली पदार्थ पकडले गेले. या अंमलीपदार्थांचे रॅकेट चालवणारा मुख्य सुत्रधार हा काँग्रेसचा नेता असल्याच पुढं आलं आहे. देशातील तरुणांना अंमलीपदार्थ विकून त्या पैशांतून निवडणूक लढवण्याचा प्रयत्न काँग्रेसकडून केला जातो आहे,” असा आरोपाही त्यांनी केला.

केंद्र सरकारने शेतकऱ्यांसाठी अनेक योजना आणल्या आहेत. महाराष्ट्राचे डबल इंजिन सरकार येथील शेतकऱ्यांना दुहेरी लाभ देत आहे. शिंदे सरकारने राज्यातील शेतकऱ्यांचे वीजबील माफ केलं आहे. मात्र, शिंदे सरकार येण्यापूर्वी काँग्रेस आणि त्यांच्या मित्रपक्षांच्या सरकारने शेतकऱ्यांना गरीब आणि दयनीय करण्यात कोणतीही कसर सोडली नाही. महाआघाडीचे सरकार असेपर्यंत त्यांचे दोनच अजेंडे होते. पहिला, शेतकऱ्यांशी संबंधित प्रकल्प थांबवणे आणि दुसरे, या प्रकल्पांच्या पैशातून भ्रष्टाचार करणे. प्रत्येक निवडणुकीपूर्वी खोटी आश्वासने देणे हा काँग्रेसचा अजेंडा आहे. महाराष्ट्रातही काँग्रेस आणि महाआघाडी सरकारने अनेक योजना बंद केल्या होत्या,” असा घाणाघाती प्रहार नरेंद्र मोदींनी केला आहे.

हे ही वाचा..

उत्तर लेबनॉनवर इस्रायलकडून झालेल्या हल्ल्यात हमासच्या प्रमुख नेत्यासह कुटुंबीय ठार

एससीओमध्ये भारत-पाकिस्तान चर्चा नाकारली

तिरुपती देवस्थानच्या प्रसादाबद्द्ल भाविकांकडून समाधान

पश्चिम बंगालमध्ये आणखी एका चिमुकलीवर बलात्कार करून हत्या

बंजारा समजाबद्दल बोलताना नरेंद्र मोदी म्हणाले की, “स्वातंत्र्याच्या लढ्यात बंजारा समाजाने मोठं योगदान दिले आहे. मात्र, स्वातंत्र्यानंतर या समाजाची नेहमीच उपेक्षा झाली आहे. या समाजाचा सन्मान करणं ही तेव्हाच्या सत्ताधाऱ्यांची जबाबादारी होती. मात्र, काँग्रेसच्या सरकारने बंजारा समाजाला मुख्य प्रवाहातून बाहेर ठेवले. आपल्या बंजारा समाजाने अनेक संत दिले. इंग्रजांनी या समुदायाला गुन्हेगार घोषित केलं होतं. पण स्वातंत्र्यानंतर बंजारा समाजाची काळजी करणं, त्यांना सन्मान देणं गरजेचं होतं. पण, काँग्रेसने त्यांना आपल्या बरोबरीचं मानलं नाही. त्यांना वाटतं फक्त आमचीच सत्ता राहावी. त्यामुळे त्यांनी बंजारा समाजाला दूर ठेवलं,” अशी टीका पंतप्रधान मोदी यांनी केली.

Exit mobile version