पंतप्रधान नरेंद्र मोदी हे जानेवारीच्या अखेरीस पुण्याचा दौरा करणार होते. पुण्यामधील विविध विकासकामांचे त्यांच्या हस्ते उद्घाटन होणार होते. मात्र, नरेंद्र मोदी यांचा पुण्याचा दौरा रद्द करण्यात आल्याचे वृत्त ‘टीव्ही ९’ने सूत्रांच्या हवाल्याने दिले आहे. पंतप्रधान कार्यालयाकडून पुणे जिल्हा प्रशासनाला याबाबत कळवण्यात आले आहे. देशभरात वाढत्या कोरोना रुग्णांच्या पार्श्वभूमीवर हा दौरा रद्द करण्यात आल्याचे वृत्त आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी हे २८ जानेवारीला पुण्याच्या दौऱ्यावर येणार होते. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या दौऱ्याची पुणे जिल्हा प्रशासनाकडून तयारी करण्यात येत होती. पुण्यात त्यांच्या हस्ते अनेक विकासकामांचे उद्घाटन होणार होते. मात्र, गेल्या काही दिवसांमध्ये देशात आणि महाराष्ट्रात कोरोना रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत आहे. याच पार्श्वभूमीवर नरेंद्र मोदींचा दौरा रद्द करण्यात आल्याचे वृत्त आहे.
हे ही वाचा:
‘या’ दिवशी होणार ९५ वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन
नेत्यांनी अनोख्या पद्धतीने सोडवला वाद…
चंदीगड महापालिकेत पुन्हा भाजपाचाच महापौर
नरेंद्र मोदी यांच्या उपस्थितीत पुण्यामध्ये विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. नरेंद्र मोदी यांच्या उपस्थितीत पुणे मेट्रो उद्घाटन, दिवंगत ज्येष्ठ व्यंगचित्रकार आर. के लक्ष्मण यांच्या नावाच कलादालन, पुणे महानगरपालिकेतील शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याचे उद्घाटन करण्यात येणार होते. मात्र, आता नरेंद्र मोदींचा दौरा रद्द झाल्याने मेट्रोचे उद्घाटन लांबणीवर पडण्याची शक्यता आहे. डिसेंबर २०२१ मध्ये केंद्रीय गृहमंत्री अमित शहा पुण्याच्या दौऱ्यावर आले होते. त्यावेळीही पुण्यातील विविध विकासकामांची उद्घाटन करण्यात आली होती.