संसदेचे अर्थसंकल्पीय अधिवेशन सध्या दिल्ली येथे सुरु आहे. या अधिवेशनात रोजच सत्ताधारी आणि विरोधक यांच्यात शाब्दिक चकमक पाहायला मिळत आहे. पण आजचा दिवस खास ठरला. सोमवार, ७ फेब्रुवारी रोजी भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लोकसभेत राष्ट्रपतींच्या अधिभाषणावर उत्तर देण्यासाठी भाषण केले. यावेळी त्यांनी सादर केलेल्या शायरीने सभागृहात एकाच हशा पिकला.
आपल्या संपूर्ण भाषणात पंतप्रधानांनी काँग्रेसची पार पिसे काढली. यावेळी बोलताना काँग्रेस पक्षाचे सभागृहातील नेते अधीर रंजन चौधरी यांना पंतप्रधान मोदींनी त्यांच्याच शैलीत उत्तर दिले आहे. चौधरी यांनी या अधिवेशनात सभागृहात अनेकदा शेरो शायरी केली. यावरच निशाणा साधताना पंतप्रधान म्हणाले की चौधरी यांच्या शायरीला ते देखील शायरीने उत्तर देतील.
हे ही वाचा:
अहमदाबाद संघाचे झाले बारसे…’हे’ असणार नाव
देशाची थट्टा उडवता, म्हणून काँग्रेस थट्टेचा विषय बनला आहे!
ठाण्यात भावी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे बॅनर झळकले
‘सिद्धू यांच्या रक्तात पंजाब, हवे तर कापून बघा’
असे म्हणत पंतप्रधान मोदींनी शायरी सादर करत काँग्रेसवर निशाणा साधला आहे. पंतप्रधानांच्या या शायराना अंदाजावर सगळेच फिदा झाल्याचे पाहायला मिळाले.
”वो जब दिन को रात कहें, तो तुरंत मान जाओ।
नहीं मानोगे तो वो दिन में नकाब ओढ़ लेंगे।
जरूरत हुई तो हकीकत को थोड़ा बहुत मरोड़ लेंगे,
वो मगरूर हैं खुद की समझ पर बेइंतहा, इन्हें आईना मत दिखाओ, वो आईने को भी तोड़ देंगे।”
''वो जब दिन को रात कहें, तो तुरंत मान जाओ।
नहीं मानोगे तो वो दिन में नकाब ओढ़ लेंगे।
जरूरत हुई तो हकीकत को थोड़ा बहुत मरोड़ लेंगे,
वो मगरूर हैं खुद की समझ पर बेइंतहा, इन्हें आईना मत दिखाओ, वो आईने को भी तोड़ देंगे।'' pic.twitter.com/bPKl5AM5pD
— BJP (@BJP4India) February 7, 2022