“बापूंचे जीवन प्रत्येक पिढीसाठी मार्गदर्शक” – पंतप्रधान मोदी

“बापूंचे जीवन प्रत्येक पिढीसाठी मार्गदर्शक” – पंतप्रधान मोदी

राष्ट्रपिता महात्मा गांधी यांची १५२ वी जयंती आज देशभर साजरी केली जात आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राजघाट येथे जाऊन महात्मा गांधी यांच्या स्मृतिस्थळाचे दर्शन घेतले आहे. राजघाट येथे जाऊन महात्मा गांधी यांच्या समोर मोदी नतमस्तक झाले. तर ट्विटरवरून पंतप्रधानांनी गांधीजींना आदरांजली अर्पण करत आपल्या भावना व्यक्त केली आहे.

आपल्याला माहीतच आहे की पंतप्रधान नरेंद्र मोदी हे महात्मा गांधींना आदर्श मानतात. महात्मा गांधींनी आपल्या जीवनात सांगितले सिद्धांत आणि तत्वज्ञान नरेंद्र मोदी आपल्या अंगिकारण्याचा प्रयत्न करत असतात. गांधीजींच्या प्रेरणेने मोदींनी आपल्या कार्यकाळात अनेक महत्त्वाकांक्षी योजना सुरू केल्या आहेत. तर दोन वर्षांपूर्वी गांधीजींच्या दीडशेव्या जयंती वर्षानिमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन देखील भारत सरकार मार्फत करण्यात आले होते.

हे ही वाचा:

कन्हैया कुमार हा दुसरा नवज्योतसिंग सिद्धू

राम मंदिर ठरतंय ‘दुबई एक्सपो’ चा आकर्षण बिंदू

ठाकरे सरकारच्या काळात मराठी भाषा मंत्रालयासमोर भीक मागत उभी आहे

योगींनी कंगनाला दिली खास भेट! भेट पाहून कंगना म्हणाली…

“राष्ट्रपिता महात्मा गांधी यांना जयंतीदिनी विनम्र आदरांजली. पूज्य बापूंचे जीवन आणि आदर्श देशाच्या प्रत्येक पिढिला कर्तव्य मार्गांवर चालण्यासाठी प्रेरित करत राहतील.” असे ट्विट मोदींनी केले आहे.

तर त्यासोबतच भारताचे माजी पंतप्रधान लालबहादूर शास्त्री यांनादेखील नरेंद्र मोदींनी श्रद्धांजली अर्पण केली आहे. नरेंद्र मोदी आपल्या ट्विटमध्ये म्हणतात, “माजी पंतप्रधान लाल बहादुर शास्त्रीजी यांना त्यांच्या जयंती दिनी शत शत नमन. मूल्ये आणि सिद्धांतांवर आधारित त्यांचै जीवन देशवासीयांकरता नेहमीच प्रेरणास्रोत म्हणून कायम राहील.”

Exit mobile version