… आणि जो बायडेन स्वतः पंतप्रधान मोदींना भेटायला आले

… आणि जो बायडेन स्वतः पंतप्रधान मोदींना भेटायला आले

पंतप्रधान नरेंद्र मोदी हे जी-७ समूहाच्या बैठकीला उपस्थित राहण्यासाठी दोन दिवसांच्या जर्मनी दौऱ्यावर गेले होते. सोमवार, २७ जून रोजी त्यांच्या दौऱ्याचा दुसरा आणि शेवटचा दिवस होता. या दरम्यान अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडेन आणि पंतप्रधान मोदींच्या भेटीचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सोमवारी अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडेन, फ्रान्सचे राष्ट्राध्यक्ष इमॅन्युएल मॅक्रॉन आणि कॅनडाचे पंतप्रधान जस्टिन ट्रूडो यांची जर्मनीत भेट घेतली. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष बायडेन आणि भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट झाली. या भेटीचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत आहे. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडेन हे दुसरीकडे जात होते दरम्यान त्यांना पंतप्रधान नरेंद्र मोदी दिसल्यानंतर जो बायडेन हे स्वतः त्यांना आर्वजून भेटण्यासाठी आले.

हे ही वाचा:

शापूरजी पालनजी उद्योगसमुहाचे प्रमुख पद्मभूषण पालनजी मिस्त्री यांचे निधन

२२ जून ते २४ जून कालावधीत मंजूर प्रस्तावांचा तपशील देण्याचे माविआला आदेश

अग्निपथ योजनेला ‘वायू’गतीने अर्ज; ९४ हजार युवक इच्छुक

धक्कादायक!! अमेरिकेत ट्रकमध्ये सापडले ४६ मृतदेह

नरेंद्र मोदी कॅनडाचे पंतप्रधान जस्टिन ट्रूडो यांच्याशी बोलत होते, त्याचवेळी अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष त्यांना भेटायला पोहोचले आणि त्यांना मागून हात लावत त्यांच्याशी हस्तांदोलन केले. यावेळी त्यांच्यासमोर अनेक दिग्गज नेते होते, मात्र बायडेन थेट पंतप्रधान मोदींकडे गेल्याने या व्हिडीओची जोरदार चर्चा होत आहे. जर्मनीमध्ये जागतिक नेत्यांसोबत नरेंद्र मोदी ज्या पद्धतीने वावरत आहेत यातून त्यांची बाहेरच्या देशातील नेत्यांसोबत घनिष्ट मैत्री असल्याचे दिसून येत आहे.

Exit mobile version