जगात भारी; नरेंद्र भाई! पंतप्रधान मोदी अव्वल

जगात भारी; नरेंद्र भाई! पंतप्रधान मोदी अव्वल

पंतप्रधान नरेंद्र मोदी हे त्यांच्या कर्तृत्वाने भारतातच नाही तर संपूर्ण जगात चर्चेत असतात. पंतप्रधान मोदी हे जगातील लोकप्रिय नेत्यांपैकी एक नेते आहेत. त्यात आता अजून भर पडली आहे. मॉर्निंग कन्सल्ट या कंपनीने केलेल्या सर्व्हेनुसार पंतप्रधान नरेंद्र मोदी लोकांची मान्यता असलेल्या नेत्यांमध्ये जगात अव्वल क्रमांकाचे नेते ठरले आहेत.

मॉर्निंग कन्सल्ट या कंपनीने ट्विटद्वारे ही दिली आहे. तर केंद्रीय मंत्री नारायण राणेंनीही ट्विट करून याबद्दल माहिती दिली आहे. राणे यांनी ही माहिती देताना आनंद व्यक्त केला आहे. आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याबद्दल अभिमान वाटत असल्याचे त्यांनी सांगितले आहे.

जगातील तेरा नेत्यांमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी हे अव्वल ठरले आहेत. या जगातील नेत्यांमध्ये अमेरिकेचे अध्यक्ष जो बायडन पासून ते जपानचे पंतप्रधान किशिदा यांना पंतप्रधान मोदींनी मागे टाकले आहे. तेरा नेत्यांमध्ये पंतप्रधान मोदींना ७७ टक्के रेटिंग मिळाले आहे. त्यांनतर मग दुसऱ्या स्थानी मेक्सिकोचे अध्यक्ष लोपेझ ओब्राडोर ६३ टक्के रेटिंगवर आहेत. आणि मग इटलीचे पंतप्रधान ड्रघी हे ५४ टक्के रेटिंगसह तिसऱ्या स्थानावर आहेत.

हे ही वाचा:

…. म्हणून मविआ नवाब मलिकांचा राजीनामा घेत नाही!

चलो दापोली…अनिल परबचे रिसॉर्ट तोडूया

एमआयएम शिवसेनेला म्हणते, मला बी जत्रंला येऊ द्या की!

काँग्रेसशासित राजस्थानमध्ये महिलेवर बलात्कार झाल्यानंतर राहुल गांधींचा कानाडोळा

केवळ पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीच ७० टक्क्यांचा आकडा कमी काळात पार केला आहे. जून २०२१ मध्ये पंतप्रधान मोदींचे रेटिंग ६६ टक्के होते मग नोव्हेंबर २०२१ मध्ये ते ७० टक्के झाले आणि त्यानंतर मार्च २०२२ मध्ये ते ७७ टक्के झाले. फक्त दहा महिन्यात मोदींच्या रेटिंगमध्ये ११ टक्क्यांची वाढ झाली आहे. हे फक्त पंतप्रधान जे जनतेसाठी काम करतात त्यामुळेच शक्य झाले आहे.

Exit mobile version