जगातील सर्वात लोकप्रिय नेता म्हणून पुन्हा एकदा भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची वर्णी लागली आहे. अमेरिकन डेटा इंटेलिजन्स फर्म ‘द मॉर्निंग कन्सल्ट’च्या सर्वेक्षणानुसार हा निकाल समोर आला असून नरेंद्र मोदी हे या यादीत आघाडीवर आहेत. पंतप्रधान मोदी यांनी यामध्ये अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष, ब्रिटनचे पंतप्रधान यांना मागे टाकले आहे.
‘द मॉर्निंग कन्सल्ट’च्या अहवालानुसार पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मान्यता रेटिंगमध्ये अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडेन आणि ब्रिटनचे पंतप्रधान बोरिस जॉन्सन यांच्यासह जगातील १३ राष्ट्रप्रमुखांना मागे टाकले आहे. सर्वेक्षणात नरेंद्र मोदींचे अप्रूव्हल रेटिंग ७१ टक्के आहे. १३ जानेवारी ते १९ जानेवारी दरम्यान हे सर्वेक्षण करण्यात आले होते. या सर्वेक्षणात भारताचे पंतप्रधान जगातील अनेक राष्ट्रपती आणि पंतप्रधानांच्या तुलनेत खूप पुढे आहेत.
हे ही वाचा:
टी- २० वर्ल्डकप मध्ये भारत पाकिस्तान लढत होणार या दिवशी
लाखभर रुपये घेऊन विकत होते प्रमाणपत्र; पोलिसांनी आवळल्या मुसक्या
नस्ती ‘किटकॅट’; चॉकलेटवर भगवान जगन्नाथाचा फोटो
धक्कादायक! माजी सरपंचाने गर्भवती वनरक्षकाला केली मारहाण
नरेंद्र मोदी यांनी जगभरातील अनेक बड्या नेत्यांना मागे टाकले आहे. या सर्वेक्षणात अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष सहाव्या तर ब्रिटनचे पंतप्रधान १३ व्या क्रमांकावर आहेत. मॉर्निंग कन्सल्टने आपल्या वेबसाइटवर म्हटले आहे की, हे रेटिंग प्रत्येक देशातील प्रौढ नागरिकांच्या सात दिवसांच्या सरासरी सर्वेक्षणावर आधारित आहे. सर्वेक्षणात सामील असलेल्या लोकांची संख्या देशानुसार बदलते. नोव्हेंबरमध्ये झालेल्या शेवटच्या सर्वेक्षणातही पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची लोकप्रियता सर्वाधिक होती.
सर्वेक्षणाची आकडेवारी
- भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी- ७१ टक्के
- मेक्सिकोचे राष्ट्राध्यक्ष लोपेझ ओब्राडोर- ६६ टक्के
- इटलीच्या पंतप्रधान मारिया द्राघी- ६० टक्के
- जपानचे पंतप्रधान फुमियो किशिदा- ४८ टक्के
- जर्मन चांसलर ओलाफ स्कोल्झ- ४४ टक्के
- अमेरिकेचे अध्यक्ष जो बायडेन- ४३ टक्के
- कॅनडाचे पंतप्रधान जस्टिन ट्रूडो- ४३ टक्के
- ऑस्ट्रेलियाचे पंतप्रधान स्कॉट मॉरिसन- ४१ टक्के
- स्पेनचे अध्यक्ष पेड्रो सांचेझ- ४० टक्के
- कोरियाचे राष्ट्राध्यक्ष मून जे-ए- ४० टक्के