पंतप्रधान नरेंद्र मोदी हे आज पुण्याच्या दौऱ्यावर आहेत. पुणे मेट्रो प्रकल्पाचे उद्घाटन नरेंद्र मोदी यांनी केले. पुणे महानगरपालिकेतून नरेंद्र मोदी हे गरवारे मेट्रो स्थानकात पोहचले. तेथे नरेंद्र मोदी यांनी मेट्रो प्रकल्पाची पाहणी केली. त्यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी उपस्थित अधिकाऱ्यांकडून संपूर्ण प्रकल्पाची माहिती जाणून घेतली. त्यानंतर त्यानंतर नरेंद्र मोदी यांनी मेट्रोचे तिकीट खरेदी केले. गरवारे मेट्रो स्थानकात पंतप्रधान मोदी यांनी बटन दाबून हिरवा झेंडा दाखवून मेट्रो प्रकल्पाचे लोकार्पण केले.
त्यानंतर नरेंद्र मोदी यांनी गरवारे स्थानक ते आनंदनगर स्थानक पर्यंत मेट्रोने प्रवास केला. या प्रवासा दरम्यान मेट्रोमधील काही दिव्यांग तरुणांशी आणि शाळकरी विद्यार्थ्यांशी नरेंद्र मोदी यांनी संवाद साधला. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते एकूण ३२.२ किमी लांबीच्या पुणे मेट्रो रेल्वे प्रकल्पाचे उद्घाटन करण्यात आले. २४ डिसेंबर २०१६ रोजी पंतप्रधानांच्या हस्ते या प्रकल्पाची पायाभरणी करण्यात आली होती. हा संपूर्ण प्रकल्प ११ हजार ४०० कोटी रुपयांपेक्षा जास्त खर्च करून बांधला जात आहे.
हे ही वाचा:
पंतप्रधान मोदी पुण्यात दाखल; छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचे केले अनावरण
‘दिशा, सुशांत प्रकरणाबद्दल बोलू नका सांगायला मुख्यमंत्र्यांचा दोन वेळा फोन’
पंतप्रधान मोदींच्या स्वागतासाठी खास फेटा
चार राज्यात भाजपा सरकार स्थापन करणार
सर्वप्रथम नरेंद्र मोदी हे पुणे महानगरपालिकेत दाखल झाले होते. तेथे त्यांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचे अनावरण केले. छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचे अनावरण झाल्यावर पुण्याचे महापौर मुरलीधर मोहोळ यांनी नरेंद्र मोदी यांना फेटा घालून आणि त्यांना शिवाजी महाराजांनी मूर्ती देऊन सत्कार केला. त्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा ताफा गरवारे मेट्रो स्थानकावर रवाना झाला. राज्यपाल राज्यपाल भगतसिंग कोश्यारी, विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस, सुभाष देसाई यांनी नरेंद्र मोदी यांचे विमानतळावर त्यांचे स्वागत केले. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे मात्र या कार्यक्रमाला अनुपस्थित होते.