रशिया आणि युक्रेन या देशांमध्ये सुरू असलेल्या युद्धाचा आज पाचवा दिवस आहे. युक्रेनमध्ये भारतीय नागरिक आणि विद्यार्थी अडकले असून सध्या या भारतीयांची सुटका करण्यावर प्राधान्य असल्याचे नरेंद्र मोदी यांनी बैठकीत सांगितले आहे. युक्रेनच्या मुद्द्यावर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली रविवारी २७ फेब्रुवारी रोजी एक उच्चस्तरीय बैठक पार पडली. आज पुन्हा एक उच्चस्तरिय बैठक पार पडली आहे. सरकारी सुत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, काही केंद्रीय मंत्री युक्रेनच्या शेजारील देशांमध्ये जाणार असल्याची माहिती समोर आली आहे.
केंद्र सरकारमधील काही केंद्रीय मंत्र्यांना युक्रेनच्या शेजारील राष्ट्रांमध्ये पाठवण्याची नरेंद्र मोदी तायरी करत असल्याची माहिती असून युक्रेनमध्ये अडकलेल्या भारतीयांना सुरक्षित सोडवून आणण्यासाठी युक्रेनच्या शेजारील राष्ट्रांशी समन्वय साधण्याची गरज आहे. हे समन्वय साधण्यासाठी या राष्ट्रांमध्ये प्रत्यक्ष भारताचे प्रतिनिधी म्हणून काही केंद्रीय मंत्र्यांनाच पाठवण्याचे नियोजन केंद्र सरकारकडून करण्यात येत आहे.
केंद्रीय मंत्री हरदीपसिंग पुरी, ज्योतिरादित्य सिंधिया, किरेन रिजिजू आणि जनरल (निवृत्त) व्ही के सिंग या मिशनमध्ये समन्वय साधण्यासाठी आणि विद्यार्थ्यांना मदत करण्यासाठी युक्रेनच्या शेजारील देशांमध्ये जाण्याची शक्यता आहे.
हे ही वाचा:
रशियाच्या हल्ल्यात जगातील सर्वात मोठं विमान उद्ध्वस्त
श्रीलंकेविरुद्ध मालिका विजयासह भारताने रचले हे नवे विक्रम
युक्रेनमधील भारतीयांच्या सुटकेसाठी पंतप्रधान मोदींनी घेतली बैठक
युक्रेनच्या सीमेवर भारतीय विद्यार्थ्यांना मारहाण
दरम्यान भारतीय नागरिकांना घेऊन ऑपरेशन गंगा अंतर्गत पाचवे विमान रोमानियामधून दिल्लीमध्ये दाखल झाले आहे. या विमानात २४९ भारतीय होते. सोमवारी सकाळी ६.३० वाजता हे विमान दिल्लीत दाखल झेल आहे. यापूर्वी चार विमानांमधून १ हजार १४७ नागरिकांना भारतात आणण्यात आले आहे.