तुमच्या मुख्यमंत्र्यांना धन्यवाद सांगा… मोदींची खोचक टीका

तुमच्या मुख्यमंत्र्यांना धन्यवाद सांगा… मोदींची खोचक टीका

पंतप्रधान नरेंद्र मोदी हे आज पंजाब दौऱ्यावर होते. मात्र, पंतप्रधान मोदी यांच्या सुरक्षा व्यवस्थेत त्रुटी आढळून आल्याने त्यांनी आपला दौरा रद्द केला. पंतप्रधान मोदी यांचा ताफा ज्या मार्गावरुन जाणार होता त्याच मार्गावर काही शेतकरी आंदोलक आंदोलन करत असल्याचे दिसून आले. त्यामुळे पंतप्रधान मोदी सुमारे २० मिनिटे आपल्या गाडीतच बसून होते. तसेच या सर्व घडामोडीनंतर पंतप्रधानांनी मुख्यमंत्र्यांना टोला लगावल्याचे वृत्त ‘एएनआय’ या वृत्तसंस्थेने दिले आहे.

नरेंद्र मोदी हे आपला पंजाब दौरा रद्द करून भटिंडा विमानतळावर पोहोचले. तेव्हा तिथे त्यांनी विमानतळ प्राधिकरणाच्या अधिकाऱ्यांकडे एक निरोप दिला आहे. ‘आपल्या मुख्यमंत्र्यांना धन्यवाद सांगा की, मी भटिंडा विमातळावर जिवंत पोहोचू शकलो’, अशा शब्दात पंतप्रधान मोदी यांनी पंजाबच्या मुख्यमंत्र्यांना टोला लगावला आहे.

दरम्यान, केंद्रीय गृहमंत्रालयाने देखील या घटनेची गांभीर्याने दखल घेतली आहे. या घटनेला गंभीर चूक असे म्हटले आहे. तसेच पंजाब सरकारला या चुकीबाबत जबाबदारी निश्चित करण्याचे आणि कठोर कारवाई करण्याचे आदेश दिले आहेत. तसेच तपास करून अहवाल सादर करण्याचे आदेश दिले आहेत.

हे ही वाचा:

महाराष्ट्राला मिळणार पहिल्या महिला मुख्यमंत्री?

अमिताभ, राज ठाकरे यांच्या बंगल्यात कोरोनाचा शिरकाव…

‘महाविकास आघाडी सरकारने आणणेला विद्यापीठ कायदा हा काळा आहे’

विधानपरिषदेचे विरोधी पक्ष नेते प्रवीण दरेकर यांना कोरोना

नरेंद्र मोदींच्या सुरक्षा व्यवस्थेत हलगर्जीपणा हा पूर्वनियोजित होता का असे प्रश्न आता उपस्थित होत आहेत. भारतीय युवा काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष श्रीनिवास बीवी यांनी ट्विट करत ‘मोदीजी, हाऊ इज द जोश?’ असे ट्विट केले आहे.

Exit mobile version