भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी हे गुरूवारी पुदूचेरी येथे गेले असता त्यांनी पप्पामल यांची भेट घेतली. या भेटीचा फोटो स्वतः मोदींनी आपल्या सोशल मीडियावर टाकला आहे. या फोटोत पंतप्रधान मोदी पप्पामल यांच्यासमोर नतमस्तक झालेले दिसत आहेत.
हे ही वाचा:
बालाकोट हल्ल्याच्या द्वितीय वर्षपूर्ती निमित्त अमित शहांनी हवाई दलाचे केले कौतूक
मुळच्या तमिळनाडूच्या असणाऱ्या १०५ वर्षांच्या पप्पामल या जैविक शेती करतात. या वर्षी भारत सरकारने त्यांना पद्मश्री पुरस्कार देऊन गौरविले आहे. आजही १०५ हे वय असताना पप्पामल या शेतात काम करतात.
लहान वयातच आई वडिलांचे छत्र हरपल्यावर पप्पामल उर्फ रंगम्मा यांचा आणि त्यांच्या दोन बहिणींचा सांभाळ त्यांच्या आजीने केला. लहान वयातच पप्पामल अपल्या वडिलांचे किराणा दुकान सांभाळू लागल्या. त्या सोबतच त्यांनी एक उपहारगृह सुरू केले. लहानपणापासूनच पप्पामल यांना शेतीची आवड होती. दुकान आणि उपहारगृहाच्या नफ्यातून त्यांनी १० एकर जमीन घेतली. या जमिनीवर पप्पामल जैविक शेती करू लागल्या. त्या भाज्या, फळे, डाळी अशा विविध गोष्टी पिकवत असत. आजही पप्पालाल २.५ एकर जमिनीवर शेती करतात.
पप्पामल यांचे जैविक शेतीमधले विवीध प्रयोग बघून तमिळनाडू कृषी विद्यापिठाने त्यांची सल्लागार म्हणून नियुक्ती केली आहे. पप्पामल यांनी राजकारणातही आपला ठसा उमटवला असून त्या गावच्या पंचायत सदस्य म्हणून निवडून आल्या होत्या.