काँग्रेसने मला ९१ शिव्या दिल्या, पण लोक त्या मातीत मिसळतील!

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कर्नाटक प्रचारसभेत केला घणाघात, डॉ. बाबासाहेब आंबेडकर, वीर सावरकर यांनाही त्यांनी शिव्या दिल्याचा मोदींनी दिला दाखला

काँग्रेसने मला ९१ शिव्या दिल्या, पण लोक त्या मातीत मिसळतील!

भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी सध्या कर्नाटकमध्ये निवडणूक प्रचार दौऱ्यावर असून तेथे त्यांनी काँग्रेसवर हल्लाबोल करताना आपल्यावर काँग्रेसच्या नेत्यांकडून कशा शिव्यांचा वर्षाव केला जात आहे, हे सांगितलेच पण या सगळ्या शिव्या जनतेच्या आशीर्वादामुळे मातीत मिसळणार आहेत, अशा शब्दांत त्यांनी विरोधकांना इशाराही दिला.

बिदर येथील प्रचारसभेत बोलताना मोदी यांनी काँग्रेसवर घणाघात केला. त्याला पार्श्वभूमी होती ती काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांनी मोदींना विषारी सापाची उपमा दिल्याची. नरेंद्र मोदी म्हणाले की, काँग्रेसने त्यांना ९१ वेळा शिव्या दिल्या. मलाच नव्हे तर डॉ. बाबासाहेब आंबेडकर, वीर सावरकर यांनाही त्यांनी शिव्या दिल्या. पण काँग्रेसने ज्यांना ज्यांना शिव्या दिल्या त्यांना त्याचे प्रत्युत्तर मिळाले आहे. या सगळ्या शिव्या जनतेच्या आशीर्वादामुळे मातीत मिसळणार आहेत.

कर्नाटकातील भाजपाच्या प्रचाराचे रणशिंग फुंकताना मोदी म्हणाले की, डबल इंजिनचे सरकार असेल तर त्याचा फायदा विकासासाठी होत असतो. बिदरचा आशीर्वाद मला याआधीही मिळाला आहे. मोदी म्हणाले की, ही निवडणूक केवळ जिंकायची नाहीए तर कर्नाटकाला देशातील प्रथम क्रमांकाचे राज्य बनविण्यासाठी महत्त्वाची आहे. राज्याचा विकास तेव्हाच होतो जेव्हा विविधांगांनी ही विकासाची गंगा वाहते. तेव्हा या राज्याला नंबर वन करण्यासाठी डबल इंजिन सरकार महत्त्वाचे ठरेल.

मोदी म्हणाले की, ९१ वेळा काँग्रेसने मला शिव्या दिल्या पण मी त्या भेटस्वरूपात स्वीकारल्या आहेत. कारण काँग्रेसने जेव्हा जेव्हा शिव्या दिल्या तेव्हा जनतेने त्यांना शिक्षा ठोठावली.

हे ही वाचा:

भारतात येण्यासाठी आता दुबईत अडकलेल्या अभिनेत्रीला हवाय पासपोर्ट

महिलाही आता तोफा हाताळणार; लष्कराच्या तोफखाना रेजिमेंटमध्ये ५ महिला

निवासी, अनिवासी मालमत्ता विकून मिळाला १० वर्षातला विक्रमी महसूल

महिलाही आता तोफा हाताळणार; लष्कराच्या तोफखाना रेजिमेंटमध्ये ५ महिला

ते म्हणाले की, या काँग्रेसवाल्यांनी बाबासाहेब आंबेडकरांनाही सोडले नाही. त्यांना अनेक वेळा शिव्या दिल्या. त्यांना ते काय काय बोलले नाहीत. दगाबाजही म्हणाले. आजही ते लोक बाबासाहेबांना शिव्या देतात. वीर सावरकरांनाही त्यांनी शिव्या दिल्या आहेत. पण मी रात्रंदिवस काम करीन आणि जनतेच्या आशीर्वादाने सगळ्या शिव्या मातीत मिसळतील.

पंतप्रधान नरेंद्र मोदी हे बिदरनंतर दुपारी रोड शो देखील करणार आहेत. त्यानंतर बंगळुरू येथे रोड शो करण्यासाठी संध्याकाळी ते रवाना होतील. कर्नाटकात शनिवारी त्यांच्या दोन सभा आणि तीन रोड शो होणार होते.

Exit mobile version