मुंबईकरांनो रेकॉर्डब्रेक मतदान करा…देशात सगळे जुने विक्रम तुटणार आहेत

नरेंद्र मोदींनी शिवतीर्थावरून केली गर्जना

मुंबईकरांनो रेकॉर्डब्रेक मतदान करा…देशात सगळे जुने विक्रम तुटणार आहेत

येत्या २० मे रोजी मुंबईत मतदान होत आहे. त्या अनुषंगाने भरगच्च अशा शिवतीर्थावर पंतप्रधान नरेंद्र मोदींनी तमाम मुंबईकरांना संबोधित केले. त्यावेळी मुंबईकरांना विक्रमी मतदान करण्याचे आवाहन करतानाच एनडीए देशात लोकसभा निवडणुकांचे सगळे विक्रम पादाक्रांत करेल, असा प्रखर आत्मविश्वास त्यांनी व्यक्त केला.
नरेंद्र मोदी यांच्या या सभेसाठी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे प्रमुख राज ठाकरे उपस्थित होते. त्यामुळे या सभेला एक वेगळे महत्त्व प्राप्त झाले होते. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार हेदेखील यावेळी उपस्थित होते.

मोदींनी मुंबईकरांना आवाहन करताना म्हटले की, चैत्यभूमीसह देश दुनियेत बाबासाहेबांचे पंचतीर्थ विकसित केले. बाळासाहेब, वीर सावरकरांचा इथे हुंकार आहे. त्यांच्या आत्म्याला आज दु:ख होत असेल की नकली शिवसेनेने बाळासाहेबांना धोका दिला आहे. सत्तेसाठी राममंदिराला शिव्या घालणाऱ्या लोकांसोबत ते गेले. मुंबई हल्ल्यानंतर पार्टी करणाऱ्यांसोबत गेले. सावरकरांना जे शिव्या देतात त्यांच्या मांडीवर ते बसलेत. सावरकरांविरोधात बोलणार नाही, असे बोलायला राहुलला भाग पाडा. हे इंडी आघाडीवाले धर्माच्या आधारावर आरक्षण देऊ इच्छितात. महाराष्ट्राच्या मातीशी गद्दारी करणारे हे लोक आहेत. शिवसेनेची ओळख घुसखोरांविरोधात होती पण नकली शिवसेना सीएएला विरोध करत आहेत. वोट बँकेला खुश करण्यासाठी या आघाडीने मुंबईला देशाला धोका दिला आहे. मुंबईकरांना तडफडवले, रक्तबंबाळ केले त्यांना हे क्लिनचीट देत आहेत. शिवाजी महाराजांच्या मातीचा यापेक्षा अधिक अपमान काय असेल. संविधानाचा मोदी हा सर्वात मोठा रक्षक आहे. मी काँग्रेसला कोणत्याही दलिता, मागासवर्गियांचे आरक्षण हटवू देणार नाही. ही मोदींची गॅरन्टी आहे. हीच वेळ आहे. याची जबाबदारी मुंबईची आहे. मुंबईने भरघोस मतदान करायचे आहे. सगळे विक्रम तोडायचे आहेत. मत द्याल तेव्हा ते मोदींच्या खात्यात जाईल. मी सगळा देश फिरलो. विश्वासाने सांगतो की जुने सगळे विक्रम यावेळी तुटतील. भारताचा मोठ्या शक्तीच्या रूपात उदय होईल.
मोदींनी मुंबईतील सगळ्या उमेदवारांची नावे घेत त्यांना भरघोस मतांनी विजयी करण्याचे आवाहन केले. पियूष गोयल, रवींद्र वायकर, मिहीर कोटेचा, उज्ज्वल निकम, राहुल शेवाळे, यामिनी जाधव, या सगळ्या उमेदवारांना २० मे रोजी होणाऱ्या मतदानाच्या दिवशी जास्तीत जास्त मतदान करण्याचे आवाहन त्यांनी केले.

 

जय भवानी, जय भवानी, जय शिवाजी छत्रपती शिवाजी महाराज की जय
अशा घोषणांनी सुरुवात करत समस्त मुंबईकरांना माझा राम राम असे म्हणत मोदींनी भाषणाला सुरुवात केली.
मोदी म्हणाले की, तुम्ही सगळे आम्हाला आशीर्वाद द्यायला आला आहात. हृदयापासून आभार व्यक्त करत आहे. मुंबई हे शहर स्वप्न नाही पाहात तर मुंबई स्वप्ने जगते. मुंबईने कधी कुणाला निराश केलेले नाही. या स्वप्ननगरीत आपल्याला २०४७च्या स्वप्नाला घेऊन आलो आहे. एक स्वप्न आहे देशाचे एक संकल्प आहे देशाचा. आम्ही सगळ्यांनी मिळून विकसित भारत बनवायचा आहे. यात मुंबईची मोठी भूमिका आहे.

विकसित भारत देऊनच जाणार..

ते म्हणाले की, मुंबईचे लोक वेगाची किंमत ओळखतात. भारतासोबत स्वतंत्र झाले अनेक देश पुढे गेले. आपण कुठे कमी पडलो. उणीव त्या सरकारमध्ये होती ज्यांनी भारतीयांच्या सामर्थ्यावर भरोसा केला नाही. विश्वास ठेवला नाही. गांधीजींच्या सल्ल्याने स्वतंत्र झाल्यावर काँग्रेसला विसर्जित केले असते तर पाच दशके भारत पुढे राहिला असता. स्वातंत्र्यानंतर भारताच्या सर्व व्यवस्थांचे काँग्रेसीकरण झाले त्यामुळे देशाची पाच दशके बरबाद केली. देश स्वतंत्र झाला तर भारत सहावी अर्थव्यवस्था होती. २०१४ ला काँग्रेस गेली तेव्हा आणि आम्हाला सत्ता मिळाली तेव्हा अर्थव्यवस्था ६व्या क्रमांकावर ११ व्या क्रमांकावर होती. हे काम त्यांनी केले. जेव्हासून आपण मला काम दिले १० वर्षांत देश ५ वी अर्थव्यवस्था बनली आहे. आज भारतात मुंबईत रेकॉर्ड गुंतवणूक येत आहे. मी गँरेटी देत आहे. मुलांना विश्वास देतो की, आपल्याला विकसित भारत देऊनच जाणार आहे.

हे ही वाचा:

“तेव्हापासून उद्धव ठाकरेंनी तमाम हिंदू बांधवांनो म्हणणं सोडून दिलंय”

काँग्रेसचा आता आमच्या ‘राहुलला सांभाळा’चा प्रयोग, सोनियांनी पदर पसरला

मविआबद्दल राज ठाकरे म्हणाले, जे सत्तेत येणारच नाहीत त्यांच्याबद्दल का बोलावे?

ममता म्हणतात, ‘तृणमूल इंडी आघाडीचा भाग’, पण काँग्रेसला विश्वास नाही!

३७०ची भिंत कब्रस्तानात गाडली

मोदींनी विरोधकांवर शरसंधान केले. ते म्हणाले, निराश लोक प्रत्येक वेळी सगळे असंभव म्हणत असता. त्यांना असे वाटत होते की, राम मंदिर असंभव आहे. जगाला हे स्वीकार करावे लागेल. भआरतात राहणआरे लोक विचारांचे इतके पक्के होते, इरादे पक्के होते की, एक स्वप्न घेऊन ५०० वर्ष लढत राहिले. हा छोटा इतिहास नाही. अविरत संघर्ष केला. अनेक पिढ्यांचा संघर्ष होता. लाखो लोकांनी बलिदान दिले. ५०० वर्षांचे हे स्वप्न आज रामलल्ला भव्य मंदिरात विराजमान आहे. निराशेच्या गर्तेत बुडालेले लोक आहेत ज्यांना आर्टिकल ३७० हटणेही असंभव वाटत होते. पण आर्टिकल ३७० ची भिंत कब्रस्तानात गाडली आहे. जे स्वप्न पाहात आहेत ३७० पुन्हा आणू त्यांनी ऐकावे की, हा वारसा मामुली नाही. जगातील कोणतीही ताकद ३७० आणू शकत नाही.

तीन तलाकलाच संसदेत तलाक तलाक तलाक म्हणत हटविण्यात आले. महिलांना ३३ टक्के आरक्षण ४० वर्षे वाट पाहात होते. संसदेत चर्चा होत असे. संविधान डोक्यावर घेऊन नाचत आहेत त्यांनी संसदेत हे विधेयक फाडले होते. या सगळ्यांच्या छातीवर बसून आरक्षण झाले की नाही? मोदींनी सांगितले की, माझा आग्रह आहे की, आशीर्वाद मागायला आलो आहे. रेकॉर्डतोड मतदान करा. मतदान करायला बाहेर पडाल तेव्हा लक्षात ठेवा की, मुंबईत बॉम्बस्फोट होत होते. घरातून बाहेर पडत असत तेव्हा घरी परतू याची खात्री नव्हती. तेव्हा कमळावर व सहकाऱ्यांच्या चिन्हावर बटन दाबून मोदींना मजबूत करा.

मोदी महाराष्ट्राबद्दल म्हणाले की, या लोकांनी जेव्हा जनादेश चोरून सरकार बनवले. तेव्हा विकास कार्यावरही आपला राग काढला. बुलेट ट्रेन असो, मुंबई मेट्रो असो, जेएनपीटी कंटेनर टर्मिनल, अनेक मोठे प्रोजेक्टना यांनी अडकवले. हे मुंबईच्या लोकांवर राग काढत होते. मोदींचा एक संकल्प आहे. मोदी मुंबईचा अधिकार देणार आहेत. आज आधुनिक सुविधा मुंबईला मिळत आहे. अटल सेतू आहे, मुंबई मेट्रोचा विस्तार होतो आहे. लोकल रेल्वेचा विस्तार होतो आहे. तो दिवसही दूर नाही. बुलेट ट्रेन मुंबईला मिळेल.

इंडी आघाडीचे इरादे खतरनाक आहेत, असे म्हणत मोदी म्हणाले की, काँग्रेसची ही अस्तित्वाची लढाई आहे कोणतीही हद्द गाठेल. मुंबई आर्थिक राजधानी आहे. १० वर्षांपूर्वी शेअर बाजार कुठे होता, आज कुठे आहे. देशातील लाखो लोक बाजाराशी जोडले आहेत. त्यावर दुनियेचा भरोसा वाढत चालला आहे. हा भरोसा तोडण्याचा इंडी आघाडीचा इरादा आहे. यांचा विचार देशासाठी आर्थिक संकटाची स्थिती निर्माण करेल, त्यापासून सावध राहा.

Exit mobile version