जपानी मुलाचं हिंदी ऐकून पंतप्रधान मोदी म्हणाले…

जपानी मुलाचं हिंदी ऐकून पंतप्रधान मोदी म्हणाले…

पंतप्रधान नरेंद्र मोदी हे दोन दिवसांच्या जपान दौऱ्यावर आहेत. दरम्यान, आज, २३ मे रोजी नरेंद्र मोदी हे जपानला दाखल झाले. यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे इतर परदेश दौऱ्याप्रमाणेच जंगी स्वागत करण्यात आले.

पंतप्रधान मोदी हे सकाळी टोकियो येथे पोहचताच नागरिकांनी नरेंद्र मोदींचे स्वागत केले. यावेळी उपस्थितांनी ‘मोदी, मोदी’, ‘भारतमाता के शेर आ रहे है’ अशा घोषणाही दिल्या. दरम्यान, जपानमधल्या काही लहान मुले पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या भेटीसाठी थांबले होते.

लहान मुलांनी नरेंद्र मोदींसाठी यावेळी चित्र काढून आणले होते. यावेळी काही जपानी मुलांनी नरेंद्र मोदींना हिंदीतून आपली ओळख करून दिली. त्याबद्दल नरेंद्र मोदींनी त्यांचं कौतुकही केलं. पाचवीत शिकणारा विझुकी या जपानी मुलाने पंतप्रधान नरेंद्र मोदींना आपली ओळख हिंदीतून करून दिली. त्यानंतर त्याचं कौतुक करत पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले, “व्वा! तू हिंदी कुठून शिकलास? तुला एकदम छान हिंदी जमतंय.” पंतप्रधान मोदींनी या मुलाने काढलेल्या चित्रावर स्वाक्षरीही करून दिली.

हे ही वाचा:

तपस : ज्येष्ठांसाठी श्रेष्ठ कार्य!

टकलेला लोकांनी टाकले!

पंतप्रधान मोदी जपान दौऱ्यावर

‘१.५, २ रुपये इंधन दर कमी करणे ही सामान्य माणसाची क्रूर थट्टा’

नरेंद्र मोदींचे स्वागत करण्यासाठी अनेकांनी फलकही आणले होते. त्यावरही नरेंद्र मोदींनी स्वाक्षरी करून लहान मुलांशी संवाद साधला. क्वाड शिखर परिषदेसाठी नरेंद्र मोदी हे दोन दिवसांच्या जपान दौऱ्यावर गेले आहेत. या दौऱ्यामध्ये भारत, ऑस्ट्रेलिया, जपान आणि अमेरिका या क्वाड सदस्य देशांमध्ये सुरक्षा रणनीतीबद्दल चर्चा होणार आहे. तसेच या राष्ट्रप्रमुखांशी नरेंद्र मोदी स्वतंत्र संवादही साधणार आहेत.

Exit mobile version