‘मन की बात’मधून पुण्याच्या भांडारकर इन्स्टिट्यूटचा गौरव

‘मन की बात’मधून पुण्याच्या भांडारकर इन्स्टिट्यूटचा गौरव

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज वर्षाच्या शेवटच्या ‘मन की बात’ या कार्यक्रमात महाराष्ट्रामधील पुण्याच्या भांडारकर रिसर्च इन्स्टिट्यूटचा गौरव केला. भारतीय संकृतीविषयी अधिक माहिती लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी पाऊल टाकणे हे अत्यंत महत्त्वाचे असल्याचे नरेंद्र मोदी यांनी म्हटले आहे.

नरेंद्र मोदी यांनी आज ‘मन की बात’मधून बोलताना वाचनाचे महत्त्व सांगत असताना त्यासाठी देशात वाचन संस्कृतीशी संबंधित सुरू असलेल्या वेगवेगळ्या प्रयोगांवरही त्यांनी भाष्य केले. दरम्यान त्यांनी पुण्याच्या भांडारकर इन्स्टिट्यूटचे कौतुक केले. पुण्यातील या भांडारकर ओरिएंटल रिसर्च इन्स्टिट्यूटने महाभारताचे महत्त्व अधोरेखित करणारा ऑनलाईन कोर्स सुरू केला आहे. आपले प्राचीन ग्रंथ आणि सांस्कृतिक मूल्य भारतातच नव्हे तर जगभरात लोकप्रिय बनविण्याचा हा प्रयत्न असल्याचे नरेंद्र मोदी म्हणाले. हा कोर्स देशभरातील लोकांसाठी उपलब्ध आहे. हा कोर्स भलेही आता सुरू झाला असेल मात्र, या कोर्समध्ये जो कंटेट शिकवला जातो तो तयार करण्याची सुरुवात शंभर वर्षांपूर्वीच झाली होती, असे मोदी म्हणाले.

हे ही वाचा:

दिवंगत ग्रुप कॅप्टन वरुण सिंह यांच्या पत्राबद्दल काय म्हणाले मोदी?

बिहारच्या मुझफ्फरपूरमध्ये बॉयलरच्या स्फोटात १० ठार

गेले सांता कुणीकडे?

सलमान खानला साप चावला

त्यानंतर नरेंद्र मोदी यांनी एक सर्बियन स्कॉलर डॉ. मोमिर निकीच यांच्याविषयीही वक्तव्य केले आहे. निकीच यांनी सर्बियन भाषेची एक डिक्शनरी तयार केली असून त्यात संस्कृत भाषेतील ७० हजार शब्द घेतले आहेत. यावरून जगभरात भारतीय संस्कृती विषयीची ओढ आणि संकृती जाणून घेण्याचे प्रयत्न सुरू असल्याचे दिसते, असे मोदी म्हणाले.

निकीच यांनी केवळ संस्कृत शब्दच डिक्शनरीत आणले नाहीत, तर वयाच्या ७०व्या वर्षी ते संस्कृत भाषा शिकले. महात्मा गांधींचे लेख वाचून संकृत शिकण्याची प्रेरणा मिळाल्यासि त्यांनी सांगितले.तसेच जे. गेंदेधरम हे ९३ वर्षांचे असून त्यांनी गेल्या चार दशकात भारतातील ४० प्राचीन ग्रंथ आणि महाकाव्यांचा मंगोलियन भाषेत अनुवाद केला आहे, असे नरेंद्र मोदी म्हणाले.

Exit mobile version