पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज ७५ व्या स्वातंत्र्य दिनानिमित्त लाल किल्ल्यावरून देशाला संबोधित केले. यावेळी त्यांनी ‘सबका प्रयास’ची हाक दिली होती. त्याबरोबरच त्यांनी विविध मुद्द्यांना स्पर्श केला. त्याबरोबरच त्यांनी काही घोषणा देखील केल्या त्यामध्ये रेल्वेबाबात महत्त्वाची घोषणा देखील त्यांनी केली.
मोदींनी लाल किल्ल्यावरून भाषण करताना रेल्वेबाबत गौरवपूर्ण उद्गार काढले होते. रेल्वे शंभर टक्के विद्युतीकरण करण्याच्या प्रयत्नात असल्याचेही त्यांनी सांगितले. त्याबरोबरच त्यांनी रेल्वे वरील वंदे भारत गाड्यांचा देखील उल्लेख केला. मोदींनी ७५ व्या स्वातंत्र्यदिनानिमित्त पुढील ७५ आठवड्यात ७५ वंदे भारत गाड्यांनी देशांतील विविध शहरांशी जोडण्याची घोषणा केली आहे. याबद्दल रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांनी ट्वीट केले आहे. त्यावेळी त्यांनी मोदींचे वाक्य ट्वीट केले आहे.
अमृत महोत्सव के 75 सप्ताह में 75 वंदेभारत ट्रेनें देश के हर कोने को आपस में जोड़ रही होंगी, ये देश ने संकल्प लिया है: पीएम @narendramodi #IndiaIndependenceDay pic.twitter.com/dUb2bizJ0w
— Ashwini Vaishnaw (@AshwiniVaishnaw) August 15, 2021
हे ही वाचा:
पंतप्रधान मोदींची लाल किल्लयावरून ‘सबका प्रयास’ची हाक
महाराष्ट्राच्या मंत्रालयाबाहेर शेतकऱ्याचा आत्मदहनाचा प्रयत्न
भारताच्या ऑलिम्पिक चमूसोबत राष्ट्रपतींची ‘चाय पे चर्चा’
वंदे भारत ही संपूर्ण भारतीय बनावटीची गाडी आहे. ही इंजिन विरहीत गाडी असून या गाडीची निर्मीती चेन्नईच्या इंटिग्रल कोच फॅक्टरीमध्ये (आयसीएफ) बांधणी केली गेली आहे. सध्या ही गाडी भारतात दोन मार्गांवर धावत आहे. ही गाडी १३० किमी प्रतितास इतक्या वेगाने धावू शकते. दिल्ली ते वाराणसी आणि दिल्ली ते कटरा अशा दोन मार्गांवर वंदे भारत मार्गांवर धावत आहे.