27 C
Mumbai
Thursday, January 9, 2025
घरराजकारणभारतातील वाघांची संख्या वाढली, आता ३१६७ वाघ

भारतातील वाघांची संख्या वाढली, आता ३१६७ वाघ

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जाहीर केली आकडेवारी, व्याघ्र प्रकल्पाला झाली ५० वर्षे

Google News Follow

Related

प्रोजेक्ट टायगर या प्रकल्पाला ५० वर्षे पूर्ण झाल्याच्या निमित्ताने भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कर्नाटकातील बंदीपूर व्याघ्र प्रकल्पाला भेट दिली आणि वाघांच्या संख्येची माहिती दिली. २०१८ मध्ये येथील वाघांची संख्या २९६७ इतकी होती ती आता ३१६७ इतकी झाली आहे.

उपलब्ध आकडेवारीनुसार २००६मध्ये वाघांची संख्या १४११, २०१०मध्ये १७०६, २०१४मध्ये २२२६, २०१८मध्ये २९६७ आणि २०२२मध्ये ३१६७ इतकी होती. विविध देशांच्या आलेल्या प्रतिनिधींसमोर बोलताना पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले की, चित्ता हा प्राणी भारतातून नाहिसा झाला होता पण नामिबिया दक्षिण आफ्रिकेतून हा रुबाबदार प्राणी भारतात आणला गेला.

पंतप्रधान म्हणाले की, एलिफन्ट व्हिस्परर्स या माहितीपटाच्या माध्यमातून निसर्ग आणि प्राणिमात्र यांच्यातील संबंधांचे छान चित्रण करण्यात आले आहे. मी उपस्थित परदेशी प्रतिनिधींना विनंती करतो की, त्यांनी आमच्या आदिवासी समाजातील परंपरा आणि त्यांची जीवनपद्धती यातून काही तरी शिकावे. भारतात हत्तींचीही मोठी संख्या आहे. जवळपास ३० हजार हत्ती इथे आहेत. आशियाई हत्तींच्या बाबतीत भारत हा जगात आघाडीवर आहे. प्रोजेक्ट टायगर हा केवळ भारतासाठी अभिमानाचा विषय नाही तर जगासाठीही आहे. भारताला स्वातंत्र्य मिळून ७५ वर्षे झाली आहेत आणि जगभरातील ७५ टक्के वाघांची संख्या भारतात आहे. निसर्गाचे रक्षण हा भारतीय संस्कृतीचा एक भाग आहे. त्यामुळेच वन्यजीव संवर्धनात भारताने अनेक शिखरे पादाक्रांत केली आहेत.

हे ही वाचा:

नव्या लूकमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी बंदीपूर व्याघ्र प्रकल्पभेटीला

सोन्याच्या आयात ३०टक्क्यांनी घसरली पण चांदीची ६६ टक्क्यांनी वाढली

शेअर बाजारातल्याअव्वल १० पैकी ८ कंपन्यांच्या बाजार भांडवलात ८२,१६९ कोटी रुपयांनी वाढ

तीन पत्तीचा डाव संपला, आता पोकर सुरू…

बोम्मन-बेलीची घेतली भेट

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी द एलिफन्ट व्हिस्परर्स या ऑस्कर विजेत्या माहितीपटातील बोम्मन आणि बेली या जोडप्याचीही भेट घेतली. त्यांच्याशी संवाद साधला आणि त्यांच्यासोबत तेथे असलेल्या हत्तींची पाहणी केली. त्यांना खाऊ घातले. १९७३मध्ये तत्कालिन पंतप्रधान इंदिरा गांधी यांनी हा प्रकल्प सुरू केला. त्याला १ एप्रिलला ५० वर्षे पूर्ण झाली. पंतप्रधानांनी आयबीसीए या मोहिमेचीही घोषणा केली. इंटरनॅशनल बिग कॅट अलायन्सच्या माध्यमातून वाघ, सिंह, बिबटे, बर्फाळ प्रदेशातील बिबटे, प्युमा, जॅग्वार आणि चित्ता यांची सुरक्षा आणि संवर्धन केले जाणार आहे. २०१९मध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी प्राण्यांची शिकार आणि प्राण्यांची अनधिकृत निर्यात रोखण्यासाठी जागतिक स्तरावरील नेत्यांना एकत्र येण्याचे आवाहन केले होते. आयबीसीएची स्थापना त्याच हेतूने करण्यात आली आहे. वाघांच्या संरक्षणासाठी अमृत काल का व्हीजन या नियतकालिकाचे प्रकाशनही करण्यात आले.

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

49,899चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
220,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा