‘सत्तेच्या अनेक उलथापालथनंतरही गोवा भारतीयत्व विसरला नाही; भारत गोव्याला विसरला नाही’

‘सत्तेच्या अनेक उलथापालथनंतरही गोवा भारतीयत्व विसरला नाही; भारत गोव्याला विसरला नाही’

पंतप्रधान नरेंद्र मोदी हे गोवा मुक्तीसंग्राम दिनानिमित्त गोव्यात दौऱ्यावर आहेत. यावेळी त्यांनी जनतेला संबोधित केले. मोदींच्या या सभेला नागरिकांनी लाखोंच्या संख्येने उपस्थिती दर्शवली होती. अतिरिक्त नागरिकांना बसण्यासाठी विशेष सुविधा उपलब्ध करावी लागल्याचे व्यवस्थापनाकडून नरेंद्र मोदी यांना सांगण्यात आले. भाषणाची सुरुवात करताना मोदींनी नागरिकांना गोवन भाषेत शुभेच्छा दिल्या.

गोवा मुक्तिसंग्रामाबद्दल बोलताना नरेंद्र मोदी म्हणाले की, आझाद मैदानात शहीद स्मारक बनवण्यात आले आहे. त्या स्मारकात चार हातची आकृती दर्शवण्यात आली आहे. ते चार हात हेच दाखवून देतात की, गोव्याच्या मुक्तीसाठी देशाच्या चारही बाजूंनी एकसाथ मदतीचे हात पुढे आले होते. भारताचा बहुतांश भाग मुघलांच्या अधिपत्याखाली असताना गोवा पोर्तुगीजांच्या अधिपत्याखाली आला होता, असे पंतप्रधान मोदी यांनी नमूद केले. त्यानंतर भारताने सत्तेत अनेक उलथापालथ पाहिल्या. मात्र, त्यानंतरही गोवा आपले भारतीयत्व विसरला नाही किंवा भारत गोव्याला विसरला नाही, असे नरेंद्र मोदी म्हणाले. गोव्यातील जनतेनेही मुक्ती आणि स्वराज्याच्या चळवळी कमी पडू दिल्या नाहीत. त्यांनी भारताच्या इतिहासात स्वातंत्र्याची ज्योत प्रदीर्घ काळ तेवत ठेवली, असे ते म्हणाले.

हे ही वाचा:

केरळमध्ये पुन्हा फोफावला राजकीय हिंसाचार! १२ तासात २ हत्या

महाविकास आघाडीचं सरकार दारू विकणाऱ्यांचं, दारू पिणाऱ्यांचं!

गोवा मुक्ती संग्रामात वीरमरण आलेल्या संघ स्वयंसेवकांची गोष्ट

शिवभोजन योजना बंद होणार? ५ महिने अनुदानच नाही

नरेंद्र मोदींनी स्वयंपूर्ण गोवा अभियानाच्या कामगिरीचे कौतुक केले. राज्याच्या कारभारातील कामगिरीबद्दल त्यांनी मुख्यमंत्र्यांचे आणि इतर मंत्र्यांचे कौतुक केले. पंतप्रधानांनी दिवंगत नेते मनोहर पर्रीकर यांना श्रद्धांजली वाहिली. ‘जेव्हा गोव्याची ही कामगिरी, नवीन ओळख लक्षात येते. तेव्हा मला माझे मित्र मनोहर पर्रीकरजी आठवतात,’ असे नरेंद्र मोदी म्हणाले.

Exit mobile version