नरेंद्रने टिपले ‘नरेंद्राचे’ स्मारक

नरेंद्रने टिपले ‘नरेंद्राचे’ स्मारक

पंतप्रधान मोदी हे सोशल मीडियावर चांगलेच सक्रिय असतात. अनेकदा ते प्रवास करताना नजरेस पडलेल्या हटके गोष्टी मोबाईलच्या कॅमेरात टिपत असतात. असाच एक व्हिडिओ नरेंद्र मोदी यांनी शुक्रवारी आपल्या सोशल मीडियावर पोस्ट केला. हा व्हिडिओ आहे कन्याकुमारी येथील विवेकानंद राष्ट्रीय स्मारकाचा.

सध्या देशात पाच विधानसभा निवडणुकांचा धुरळा सुरू आहे. सर्वच राजकीय पक्षांनी आणि देशातील प्रमुख नेत्यांनी प्रचारसभांचा सपाटा लावला आहे. पंतप्रधान मोदी यांच्याही विविध ठिकाणी प्रचारसभा सुरू आहेत. मोदींची अशीच एक सभा शुक्रवार २ एप्रिल रोजी कन्याकुमारी येथे पार पडली. या प्रचारसभेला मोदी जात असतानाच त्यांच्या नजरेस पडले कन्याकुमारी येथील विवेकानंद राष्ट्रीय स्मारक. आकाशातून दिसणारे स्मारकाचे ते नयनरम्य दृश्य मोदींना फारच भावले. त्यात पंतप्रधान मोदींचे त्या स्मारकाशी विशेष नाते आहे. त्यामुळे त्यांच्या हृदयात त्या स्मारकाचे खास स्थान आहे. असे हे स्मारक नजरेस पडल्यावर मोदींना रहावले नाही. त्यांनी तडक आपला फोन काढून त्यात विवेकानंद शिला स्मारकाचे अवकाशातून दिसणारे दृष्य टिपले. या स्मारकासोबतच त्याच्याच बाजूला असणाऱ्या थिरूवल्लूर यांच्या भव्य पुतळ्याचेही दृष्य मोदींनी टीपले आहे.

हे ही वाचा:

असे सुरू होते नामांकित ब्रॅण्डसच्या बनावट दूधाचे रॅकेट

घरात दोन कोविड रुग्ण असताना मुख्यमंत्री बाहेर कसे पडले?

एलडीएफने भगवान अय्यपांच्या भक्तांचं स्वागत पायघड्यांऐवजी लाठीने केले

या दृष्याचा आनंद देश-विदेशातील नागरिकांना लुटता यावा म्हणून मोदींनी हा खास व्हिडिओ आपल्या सोशल मीडियावर टाकला आहे. “कन्याकुमारी येथील प्रचारसभेला जाताना वाटेवर असलेल्या दिमाखदार अशा विवेकानंद शिला स्मारकाची आणि थिरूवल्लूर यांच्या भव्य पुतळ्याची ही खास झलक” असे म्हणत मोदींनी हा व्हिडिओ ट्विट केला आहे.

विवेकानंद स्मारकाशी विशेष नाते

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे कन्याकुमारी येथील विवेकानंद केंद्राशी विशेष नाते आहे. युगनायक स्वामी विवेकानंद हे नरेंद्र मोदींसाठी खूपच पूजनीय आहेत. स्वामी विवेकानंद आपले प्रेरणास्थान असल्याचे मोदी नेहमी सांगतात. तर अशा या विवेकानंदांचे शिला स्मारक ज्यांच्या अथक प्रयत्नातून साकार झाले त्या एकनाथजी रानडे यांच्याशीही पंतप्रधान मोदींचा स्नेह होता. नरेंद्र मोदी जेव्हा राजकारणात येण्याच्या आधी संघकार्यात सक्रीय होते, तेव्हा मुळचे संघ प्रचारक असणाऱ्या आणि नंतर ज्यांनी विवेकानंद केंद्राची स्थापना केली अशा एकनाथजींशी मोदींचा अनेकदा संपर्क आला आहे. त्यामुळे पंतप्रधान नरेंद्र मोदींचे या स्मारकाशी दुहेरी नाते आहे.

Exit mobile version