नारायण राणे महाराष्ट्राबद्दल ‘हे’ म्हणाले

नारायण राणे महाराष्ट्राबद्दल ‘हे’ म्हणाले

केंद्रात सूक्ष्म, मध्यम आणि लघु उद्योग या खात्याची जबाबदारी सोपविण्यात आल्यानंतर नारायण राणे यांनी आपल्या कामाला वेगाने सुरुवात केली आहे. महाराष्ट्रात विविध योजनांची अंमलबजावणी करण्यासाठी ते पुढाकार घेणार असल्यामुळे उत्सुकता वाढली आहे.

भाजपा उद्योग आघाडी, महाराष्ट्रच्या वतीने प्रदेश अध्यक्ष व राष्ट्रीय सूक्ष्म, लघु, मध्यम उद्योग बोर्डचे सदस्य प्रदीप पेशकार यांनी केंद्रीय उद्योगमंत्री नारायण राणे यांची दिल्लीत भेट घेतली आणि देशातील तसेच महाराष्ट्रातील विविध मुद्द्यांवर सविस्तर चर्चा केली. महाराष्ट्रातील उद्योगांना असलेल्या विविध अडचणींबाबत चर्चा करून निवेदन दिले.

प्रामुख्याने बॅंकांच्या बाबतीतील समस्या, दुसऱ्या लाटेमुळे निर्माण झालेल्या आर्थिक अडचणींवर उपाय म्हणून कर्ज खाते पुनर्बांधणी म्हणजे रिस्ट्रक्चरिंग करण्यासाठी विशेष धोरण ठरवावे तसेच डिजिटल एम. एस. एम. ई. अभियान राबविण्यासाठी प्रयत्न करण्यासंबंधी चर्चा झाली.

हे ही वाचा:

रिझर्व्ह बँकेची आता ‘या’ बँकवर मोठी कारवाई

छगन हरण बघ

का दुःखी आहेत एसटीचे सेवानिवृत्त कर्मचारी?

भाजपा आमदारांचा एक महिन्याचा पगार पूरग्रस्तांसाठी मुख्यमंत्री निधीला

मार्केटिंग सपोर्ट योजनेत व्हर्चुअल प्रदर्शनाचा समावेश करावा अशी हि मागणी केली. महाराष्ट्रातील प्रत्येक जिल्ह्यात एम.एस. एम. ई. पार्क उभारण्यास अनूकूलता मंत्रीमहोदयांनी दाखवली. राष्ट्रीय सुक्ष्म लघु मध्यम उद्योग बोर्डच्या माध्यमातून राज्यात योजनांची प्रभावीपणे अंमलबजावणी साठी विशेष बैठक घेण्याचेही मान्य केले.

नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली केंद्र सरकारमध्ये नुकतेच फेरबदल करण्यात आले त्यात महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री नारायण राणे यांच्याकडे या एम.एस.एम.ई खात्याची जबाबदारी सोपविण्यात आली आहे.

Exit mobile version