केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्या जनशीर्वाद यात्रेला शुक्रवार, २७ ऑगस्ट रोजी पुन्हा सुरुवात झाली आहे. नारायण राणे यांच्या अटक नाट्यानंतर या यात्रेचे महत्व आणखीनच वाढले आहे. शुक्रवारी राणे यांनी रत्नागिरी येथे पत्रकार परिषद घेत ठाकरे सरकारवर हल्लाबोल केला आहे. ‘नारायण राणेच्या नादी लागू नका…नाही तर मला सगळेच बोलावे लागेल’ असा इशारा राणे यांनी दिला आहे.
या वयतिरिक्त राणे यांनी सरकारी अधिकाऱ्यांनाही कायद्याने वागायचं सल्ला दिला आहे. तर यात्रेनंतर आपण पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना यात्रे संबंधीचे सर्व रिपोर्टींग करणार आहोत असे सांगितले. सरकारच्या योजना लोकांना सांगून त्यांचे प्रश्न सोडवण्यासाठी आपण प्रयत्नशील असल्याचेही राणे म्हणाले आहेत.
हे ही वाचा:
अजूनही शिवसेनेची संकुचित वृत्ती
ऐन गणेशोत्सवात पीओपी मूर्तींवर बंदी?
द एम्पायर या वेबसिरीजवर त्वरित बंदी घाला
‘कोळी समाजाला हद्दपार करण्याचे शिवसेनेचे कारस्थान’
काय म्हणाले राणे?
मी फिरत असताना, जी काही घटना घडली त्यावर मी भाष्य करणार नाही. ती कायद्याला धरून नव्हती, कायदेशीर नव्हती. काहीजण असे दाखवण्याचा प्रयत्न करत आहेत. त्यांना सांगू इच्छितो पण आम्ही जन्माला काय फक्त विरोधी पक्षांनी म्हणून राहायला आलेलो नाही. भविष्यात आम्ही सत्तेत येऊ आणि केंद्रात तर सत्तेत आम्ही आहोतच. तेव्हा अधिकाऱ्यांना, वरिष्ठांनी काही जरी आदेश दिले तरी कायद्याने कारवाई करावी असे पोलिसांना सांगू इच्छितो. त्यानंतर जी कारवाई होईल त्याला तुम्हाला सामोरे जावे लागेल.
राज्यात कायदा-सुव्यवस्थेचा प्रश्न १ लाख ५७ हजार नागरिक दगावले देशातील सगळ्यात जास्त मृत्यू आपल्या महाराष्ट्रात झाले. महाराष्ट्र नंबर वन आहे. ही या सरकारची ख्याती आहे. राज्यात कोरोना आणि कोरोनाची बंधने सरकारने फक्त नारायण राणे साठीच लावली आहेत, इतर कोणासाठी नाही असे राणे म्हणाले. कोरोना मोठ्या प्रमाणात असताना अशी कारवाई होताना दिसत नाही. पण आता संपूर्ण कोरोना संपल्यावर अशी कारवाई होताना दिसते ही सत्तेची मस्ती आहे.
‘राज्यात कायदा सुव्यवस्थेचा बोजवारा उडाला आहे. महिलांवर घरात घुसून बलात्कार होतात, दरोडे पडतात, खून मारामाऱ्या होत आहेत. सुशांतची हत्या झाली. दिशा सॅलीयनची बलात्कार करून हत्या झाली. त्यांचे आरोपी मिळाले नाहीत. अशी अनेक प्रकरणे आहेत ज्यात खरे आरोपी मिळाले नाहीत आणि जे मिळणारही नाहीत. नारायण राणेच्या नादी लागू नका. आत्ता थोडंच बोलतोय नाहीतर मला सगळेच बोलावं लागेल ते परवडणारे नसेल.’ असा इशारा राणे यांनी दिला आहे. तर ‘आम्ही एवढे क्रिमिनल होतो तर मला मुख्यमंत्री कसे केले? एवढे वर्ष पद कसे दिले?’ असा सवाल राणेंनी केला आहे.
कोकणात उभारणार औद्योगिक प्रशिक्षण केंद्र
दरम्यान नारायण राणे यांनी कोकणच्या दृष्टीने एक महत्वाची घोषणा केली आहे. कोकणात औद्योगिक प्रशिक्षण केंद्र उभारणार असल्याचे राणेंनी घोषीत केले आहे. कोकणात औद्योगिक प्रगती होण्यासाठी काम करणार असल्याचे त्यांनी सांगितले. कोकणात मोठे ट्रेनिंग सेंटर उभारणार असल्याचे राणे यांनी घोषित केले. सिंधुदुर्ग जिल्ह्यात हे दोनशे कोटींचे ट्रेनिंग सेंटर उभे राहील. यामध्ये उद्योगांना लागणारे प्रशिक्षण, मशिनरी, कर्ज या सर्वांबद्दल माहिती दिली जाईल असे राणे यांनी सांगितले.
दोन वर्षात राज्य सरकारने कोकणाला काय दिले असा सवाल राणेंनी केला आहे. जिल्ह्यात शिवसेनेची सत्ता आहे. जिल्हा परिषद कर्जबाजारी करून टाकली पुराचे पैसे दिले का? पुनर्वसन केले का? असे राणेंनी प्रश्नांचा भडीमार केला आहे. तर राज्य सरकारच्या सुरू असलेला कारभार जनतेला दाखवण्याचा प्रयत्न आपण करणार आहोत असे राणे यांनी सांगितले आहे.