खोकासुरांचे मर्दन होणारच असे वक्तव्य शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांनी दसरा मेळाव्यात बोलताना केले होते. त्याचा खरपूस समाचार भाजप नेते नारायण राणे यांनी घेतला आहे. भुजबळांप्रमाणे चतुर्वेदी सीए याने मातोश्रीची कागदपत्रे व्हाईट करून घेतली असल्याचा गंभीर आरोप राणे यांनी पत्रकार परिषदेत बोलतांना केला आहे. दसरा मेळाव्यातील ठाकरे यांच्या भाषणावर राणे यांनी घणाघाती टीका केली आहे.
या वक्तव्याचा समाचार घेताना राणे म्हणाले की, राजमुद्रा प्रिटिंग प्रेसच्या गौरी भिडे यांनी उच्च न्यायालयात प्रबोधन प्रकाशन प्रायव्हेट लिमिटेड उद्धव ठाकरे यांच्या उत्पन्नाचा स्रोत काय अशी विचारणा करणारी याचिका उच्च न्यायालयात दाखल केली आहे. त्याचा संदर्भ देत राणे म्हणाले की, सामना आणि उद्धव ठाकरे यांच्या उत्पन्नाचे स्रोत काय हे सांगावे,. कोरोनाच्या दोन वर्षाच्या काळात उद्योग बंद झाले. बेकारी आली. नोकऱ्या गेल्या. सगळ्या कंपन्या तोट्यात गेलेल्या असताना सामनाला दोन वर्षात ४२ कोटी रुपयांचा नफा कसा झाला असा सवाल राणे यांनी केला .
इकडचे खोके सामनात नेऊन पांढरे करून घेण्याचे काम झाले आहे. भुजबळांचा सीए चतुर्वेदीनेच मातोश्रीचे पैसे पांढरे केले. भुजबळांनी ईडीमुळे अडीच वर्ष आत काढली. आता उद्धव ठाकरे यांना पुढची अडीच वर्ष काढायची आहेत. तुम्ही लोकांचे शोषण करून हे पैसे मिळवले आहेत. पण आम्ही सोडणार नाही, असा इशारा राणे यांनी यावेळी दिला.
मोठ्या माणसांवर टीका केली म्हणजे आपण खूप मोठे झालो असे त्यांना वाटते. ठाकरे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्यावर टीका केली. या माणसाला आपण कोण आहोत याचा कधी तरी जाणीव करून दिली पाहिजे. कोण तुम्ही? अपघाताने मुख्यमंत्री झालात. अडीच वर्षात अडीच तास मंत्रालयात आला. मुख्यमंत्री म्हणून महाराष्ट्राच्या हितासाठी काय केले ते पाच ऑक्टोबरच्या मेळाव्यात तुम्ही सांगायला हवे होते. राज्यातील उद्योग , आरोग्यासाठी तुम्ही काय केलं. तुम्हाला विधायक कामाचा काय अनुभव. उद्धव ठाकरे बोलायला उभे राहतात आणि लोक सभा सोडून जातात.
हे ही वाचा:
सुप्रसिद्ध ज्येष्ठ अभिनेते अरुण बाली यांचे निधन
मुंबईतल्या गोडाऊनमधून १०० कोटींचे एमडी जप्त
उत्तर प्रदेशमध्ये तरुणाने अमित बनून हिंदू मुलीवर केला बलात्कार
मेस्सी म्हणतो हा माझा शेवटचा विश्वचषक
ठाकरे यांना जमीन दाखवायची गरज नाही ते आपोआपच जमिनीवर आले आहेत. उद्धव ठाकरेंच्या नेतृत्वात शिवसेना खाली आली उद्धव ठाकरे साध २० मिनिटेचालू शकत नाही. वाकायलाही डॉक्टरांची मदत लागते. मग काम काय करणार असा खोचक टोलाही राणे यांनी लगावला. मोदी पाकिस्तान गेले त्यात बिघडले काय ? आंतरराष्ट्रीय संबंध जपावे लागतात. ठाकरे यांना मुख्यमंत्रीपदच कळले नाही तर हे काय कळणार अशा टीकाही राणे यांनी केली.
हा तर तमाशाकारांचा मेळावा
बाळासाहेबांच्या भाषणातून विचारांची मेजवानी मिळायची. त्यातून अमची जडणघडण झाली. त्यावेळचे साहेबांचे विचार आणि आताचे पक्ष प्रमुखांचे विचार. भाषणात वैचारिक पातळी नव्हती. शिवसेनेचा दसरा मेळावा शिमग्यासारखा झाला. शिवाजी पार्कचा मेळावा हा फक्त तमाशाकारांचा मेळावा होता अशी खोचक टीका राणे यांनी यावेळी केली.