केंद्रीय मंत्री नारायण राणे यांचा घणाघात
नुकत्याच देशभरात झालेल्या पोटनिवडणुकांबाबत सुरू असलेल्या चर्चेच्या निमित्ताने केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी महाराष्ट्रातील आघाडी सरकारवर हल्लाबोल केला आहे. पत्रकार परिषदेत ते म्हणाले की, देशात विधानसभा, लोकसभेच्या पोटनिवडणुका झाल्या त्यात एक जागा दादरा नगर हवेलीची अपक्ष उमेदवाराच्या आधारे जिंकण्यात आली. पण शिवसेनेने डंका वाजवला की, आम्ही महाराष्ट्राबाहेर जिंकलो. या उमेदवाराची मी निशाणी मागून घेतली. फलंदाज बॅट घेऊन उभा आहे अशी ती निशाणी आहे. पण दुसऱ्यांच्या मुलाचे बारसे करायची सवय शिवसेनेला आहे.
राणे यांनी सामनामध्ये आलेल्या अग्रलेखावर सडकून टीका करताना म्हटले की, दादरा नगरहवेली येथे डेलकर निवडून आल्या. पण त्याबद्दल शिवसेना आम्हाला यश मिळालं, आम्हाला यश मिळालं अशी ओरड करतायत. आम्ही दिल्ली काबीज करणार असं म्हणू लागली. लिखाण करताना भान नसणार त्या व्यक्तीला आमचे ३०० पेक्षा अधिक खासदार आहेत, हे माहिती नाही का? दिल्लीला धडक मारण्याची भाषा करणाऱ्या राऊतांनी याचा विचार करावा. दिल्लीला धडक मारलीत तर डोक्याशिवाय राऊत दिसतील. डोकं जागेवर राहणार नाही.
हे ही वाचा:
उत्तरप्रदेश, हरियाणानंतर मध्यप्रदेशात येणार ‘हा’ कायदा
आदिगुरू शंकराचार्यांचे ध्यानस्थ शिल्प देशाला अर्पण
राणे म्हणाले की, मोदींवर रोज उठून टीका केली जाते. पण आता शिवसेनेचे ५६ आमदार आहात ते मोदींमुळेच निवडून आले आहेत हे विसरू नका. पण हेच मुख्यमंत्री आता काय बोलतात कळत नाही. पत्रकारांनाच कळते. पत्रकार म्हणतात त्यांनी चौफेर फटकेबाजी केली. मीडियाने त्यांना सांभाळून घेतले आहे.