27 C
Mumbai
Wednesday, November 6, 2024
घरराजकारणराऊतांची रवानगी लवकरच तुरुंगात

राऊतांची रवानगी लवकरच तुरुंगात

नारायण राणेंचा गौप्यस्फोट

Google News Follow

Related

सुशांतसिंह राजपूत प्रकरणाची चौकशी सुरु झाल्यानंतर पिल्लू गप्प का झालं. काय बोलतो? कशासाठी बोलतो? माणसं तरी ओळखता येतात का? असा हल्ला बोल केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी आदित्य ठाकरे यांच नाव न घेता केला आहे. भांडूपमध्ये कोकण महोत्सवाचे आयोजन करण्यात आले होते. त्यावेळी त्यांनी उद्धव ठाकरे,आदित्य ठाकरे आणि संजय राऊत यांच्यावर जोरदार टीका केली.

संजय राऊत  आता तुरुंगातच जातील असा ठाम विश्वास त्यांनी यावेळी व्यक्त केला.इथे एक जवळच टिनपाट संपादक राहतो. मराठी माणसासाठी कोण काम करतय ते पाहा. त्यामुळे संजय राऊत तोंड बंद कर. मी देशात काम करतोय. तू खाल्लेल्या मिठाला जाग. माझ्या वाटेला कोणी जात नाही म्हणून संजय राऊत पोलीस सुरक्षेत राहा. नाहीतर जेलमध्ये जा,असा इशाराच नारायण राणे यांनी राऊत यांना दिला आहे.

तू कोणाला सांगतो येऊन दाखव. त्या उद्धव ठाकरेंचे शिवसेनेत योगदान किती? आताचे शिवसैनिक हे आयत्या बिळावर नागोबा आहेत. शिवसेना मोठी करण्यात माझं योगदान आहे. संपादक आहे तर चांगलं लिहावं हा खासदार झाला हे माझंच पाप आहे. एकदा बाळासाहेबांनी मला बोलावलं आणि याला म्हणजेच राऊतला संपादक बनव असं सांगितलं, असा दावाही नारायण राणे केला.

नारायण राणे शिवसेनेत असताना कोणी शिवसेनेतून बाहेर जात होतं का? आणि आता दिवसाढवळ्या जात आहेत. शिवसेनेची आताचीअवस्था प्रचंड वाईट आहे. ४० आमदार दिवसाढवळ्या निघून जातात आणि खोके घेऊन आमदार गेल्याचं हे म्हणत आहेत.

हे ही वाचा:

गोवा गुटख्याच्या मालकासह दाऊदच्या तीन साथीदारांना १० वर्षांचा कारावास

कट्टरतावादी विचारसरणीच्या कैद्यांना स्वतंत्र बराकी

महापालिका, नगरपरिषदांमध्ये लवकरच ४० हजार पदांची भरती

एलएमएलचे इ-स्कूटरने कमबॅक

तुम्ही लोकांनी खोके घेतले म्हणता मग मातोश्रीवर आम्ही काय पुष्पगुच्छ घेऊन जायचो का? आम्ही कुठे कुठे काय काय पोहोचवलं, मातोश्रीच्या कोणत्या मजल्यावर काय दिलं हे आता सांगायला लावून नकोस, असा इशाराही त्यांनी दिला.

हे अडीच वर्ष बसले मुख्यमंत्री म्हणून पण काय केल? कोकणसाठी फक्त बढाया मारल्या. पण केलं काय? विमानतळ मी केलं. विनायक राऊत विरोध करत होते. त्याला टक्केवारी हवी होती.उद्धव ठाकरेंनी शिवालयात संजय राऊतच्या विरोधात उमेदवार तयार ठेवला होता. पण मला बाळासाहेबांनी याचे नाव सांगितले होते. याचे नाव इलेक्शनच्या यादीत नव्हते. त्याला काँग्रेसच्या रोहिदास पाटील यांनी विरोध केला होता. ह्याला खासदार बनवायला खर्च मी केला. खर्च मी सांगणार नाही आणि हा मला विचारतो? असा सवाल करतानाच आता याची रवानगी जेलमध्येच होईल. एवढी हेराफेरी याची आहे, असा गौप्यस्फोटही त्यांनी केला.

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

49,899चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
187,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा