करावे तसे भरावे…नारायण राणे बरसले

करावे तसे भरावे…नारायण राणे बरसले

शुक्रवार, २५ जून रोजी महाराष्ट्राचे माजी गृहमंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अनिल देशमुख यांच्या घरांवर सक्तवसुली संचालनालयाने धाड टाकत कारवाई केली आहे. यावरऔनच शुक्रवारी राज्याचे राजकारण तापले असून या कारवाईवरून विविध नेत्यांनी आपल्या प्रतिक्रिया दिल्या आहेत. यातच आता भारतीय जनता पार्टीचे नेते आणि राज्यसभा खासदार नारायण राणे यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षावर निशाणा साधला आहे. ‘करावे तसे भरावे…आणि ही भरण्याची वेळ आहे’ असे राणे यांनी म्हटले आहे.

अनिल देशमुख यांच्या घरावर सक्तवसुली संचालनालयाने टाकलेल्या छाप्यांबद्दल प्रतिक्रिया देताना नारायण राणे हे राष्ट्रवादी कॉंग्रेसवर चांगलेच बरसले. अनिल देशमुखांवर झालेली कारवाई राजकीय स्वरूपाची नसून ती कायदेशीर कारवाई आहे असे नारायण राणे म्हणाले. मराठीत एक म्हण आहे करावे तसे भरावे आता ही भरण्याची वेळ आहे. जे केले त्याची चौकशी सुरू आहे. याचे कोणीही राजकारण करू नये. राष्ट्रवादी काँग्रेसने तर अजिबातच करू नये. आता सिद्ध होऊ द्या. गोष्टी बाहेर येऊ द्या. मग बघू काय ते असा पवित्रा नारायण राणे यांनी घेतला आहे.

हे ही वाचा:

अनिल देशमुखांचे खासगी सचिव ईडीच्या ताब्यात

संजय राऊत वाजवतात राष्ट्रवादीची सुपारी

देशमुख, परब ही प्यादी; खरे सूत्रधार सिल्व्हर ओक आणि वर्षावर

शरद पवारांनी केली अनिल देशमुखांची पाठराखण

देशमुख ह्यांच्या विरोधात होत असलेली ही कारवाई आकसातून होत असल्याचा आरोप महाविकास आघाडीच्या नेत्यांनी केला आहे. तर उच्च न्यायालयाच्या निर्देशानुसारच ही कारवाई होत असून यात कोणत्याही प्रकारचा राजकीय अन्वयार्थ शोधण्याची गरज नसल्याची प्रतिक्रिया भाजपाकडून देवेंद्र फडणवीस यांनी दिली आहे. तर राष्ट्रवादीचे काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी प्रतिक्रिया देताना आम्हाला या कारवाईची चिंता नाही असे म्हणत देशमुखांची पाठराखण केली आहे.

Exit mobile version